Rain Alert: धरणक्षेत्रात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात

मागील काही दिवसात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक भागात वाफसा स्थितीत आली होती. त्यामुळे खरिपातील सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), तूर, मूग, उडीद, बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.
Catchment Area
Catchment AreaAgrowon

पुणे : गेल्या आठ दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील धरणांच्या पाणलोट क्षेत्रात (Catchment Area) पावसाचा जोर काहीसा ओसरला होता. मात्र, शनिवारपासून पुन्हा या भागात पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात झाली आहे. रविवारी (ता. २४) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ४६ मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद जलसंपदा विभागाकडे झाली आहे.

मागील काही दिवसात पावसाचा जोर कमी झाल्यामुळे अनेक भागात वाफसा स्थितीत आली होती. त्यामुळे खरिपातील सोयाबीन (Soybean), कापूस (Cotton), तूर, मूग, उडीद, बाजरी पिके वाढीच्या अवस्थेत आहेत.

Catchment Area
Pulses: छत्तीसगडमध्ये कडधान्यांच्या सरकारी खरेदीची हमी

पश्चिम पट्यात कमी झालेल्या पावसामुळे भात खाचरातील पाण्याचा प्रवाह काहीसा कमी झाला होता. त्यामुळे भात पट्यातील अनेक शेतकऱ्यांनी भात लागवडी केल्या होत्या. सध्या भात पिके वाढीच्या अवस्थेत आहेत असून काही ठिकाणी भात लागवडी (Paddy Cultivation) सुरू आहेत.

Catchment Area
Chilli: आंध्र प्रदेशात मिरचीचा ठसका का वाढतोय?

पवना धरणांच्या पाणलोट क्षेत्रापाठोपाठ टेमघर धरणांच्या पाणलोट क्षेत्रात ४४ मिलिमीटर पाऊस पडला. वडीवळे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ३५ मिलिमीटर, गुंजवणी ३४, कळमोडी २८, वरसगाव २३, पानशेत २२, माणिकडोह १९, नीरा देवघर १९, चिल्हेवाडी १७, पिंपळगाव जोगे १६, भामा आसखेड १५, भाटघर १४, आंध्रा १० मिलिमीटर पाऊस पडला.

तर खडकवासला, चासकमान, शेटफळ, नाझरे, वीर, येडगाव, वडज, डिंभे, विसापूर, उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही तुरळक सरी बरसल्या. त्यामुळे धरणांत मागील चोवीस तासांमध्ये ३.५५ टीएमसी पाणीसाठा नव्याने दाखल झाला होता. यामध्ये मुठा खोऱ्यातील टेमघर, वरसगाव पानशेत, खडकवासला धरणांत ०.४४ टीएमसी पाणीसाठा नव्याने झाला आहे.

Catchment Area
MSP Law: एमएसपी कायद्याचे आश्वासन दिले नव्हते : तोमर

नीरा खोऱ्यातील पवना, कासारसाई, कळमोडी, चासकमान, भामा आसखेड, आंध्रा, वडीवळे, शेटफळ, नाझरे, गुंजवणी, भाटघर, नीरा देवघर आणि वीर धरणांत ०.७३ टीएमसी नव्याने पाणीसाठा झाला आहे. कुकडी धरणांच्या पाणलोट क्षेत्रातील पिंपळगाव जोगे, माणिकडोह, येडगाव, वडज, डिंभे, चिल्हेवाडी, घोड धरणांत नव्याने ०.७२ टीएमसी नव्याने पाणीसाठा झाला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com