Rain Update : काही भागांत पावसाचा जोर पुन्हा वाढला

राज्यांच्या अनेक भागात सोमवारी पावसाचा जोर वाढला होता. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागांत अतिवृष्टी झाली.
Rain Update
Rain UpdateAgrowon

पुणेः राज्यांच्या अनेक भागात सोमवारी पावसाचा जोर वाढला (Rain Force Increased) होता. कोकण, मराठवाडा आणि विदर्भात अनेक भागांत अतिवृष्टी झाली (Heavy Rainfall In Konkan, Marathwada And Vidarbh). तर हवामान विभागानं उद्या सकाळपर्यंत अमरावती, अकोला, वर्धा या जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट (Rain Orange Alert) जाहिर केला. तर राज्यात जोरदार पावसाचा येलो अलर्ट (Rain Yellow Alert) देण्यात आला.

कोकणात पावसाचा जोर काहीसा कमी झाला. मात्र सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर या जिल्ह्यांत अधूनमधून जोरदार सरी होत आहेत. परंतु नद्यांची पाणीपातळी वाढलेली नाही. तर पुणे जिल्ह्यातील पश्चिम पट्ट्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडला. अनेक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी बरसत आहेत. त्यामुळे शेतीकामांना काही प्रमाणात वेग आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाल्याने सर्वच नद्यांचे पाणी पात्राकडे जात आहे. विविध नद्यावरील 53 बंधारे अद्यापही पाण्याखाली आहेत. तर सांगली जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून पावसाने उघडीप दिली.

Rain Update
Kharip Sowing: मराठवाड्यात ४१ लाख ४३ हजार हेक्टरवर पेरणी

सोलापूर जिल्ह्यात दोन दिवसाच्या विश्रांतीनंतर सोमवारी सकाळपासूनच पावसाने पुन्हा सुरुवात केली. जिल्ह्यातील बहुतेक भागात दिवसभर ढगाळ वातावरण राहिले, तर काही भागात पावसाच्या सरीवर सरी कोसळत राहिल्या. नगर जिल्ह्यातील अकोले तालुक्याच्या पश्चिम भागातही पावसाचा जोर कमी झाला. खानदेशात तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर सोमवारी पुन्हा पावसाचे आगमन झाले. परंतु पावसामुळं कापूस, केळी पिकातील तणनियंत्रण, आंतरमशागत, खते देणे, फवारणीची कामे पुन्हा ठप्प झाली आहेत.

Rain Update
Maharashtra Rain News: राज्यात पाऊस ओसरला

मराठवाड्यात १ जून ते १८ जुलै या कालावधीत १७२ मंडळात अतिवृष्टी झाली. त्यापैकी तब्बल ८० मंडळे एकट्या नांदेड जिल्ह्यातील आहेत. नांदेड जिल्ह्यात रविवारपासून पावसाने पुन्हा संततधार सुरू केली. हा पाऊस जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांत झाला. त्यामुळं खरिपातील पिकांचं नुकसान वाढल्याची शक्यता आहे.परभणी जिल्ह्यातील सर्व ५२ मंडळांमध्ये मध्यम ते जोरदार पाऊस झाला. तर हिंगोली, कळनुरी, वसमत, औंढा नागनाथ, सेनगाव तालुक्यांतील अनेक मंडळांमध्ये पावसाचा जोर होता.

विदर्भातील अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, नागपूर या सर्वच जिल्ह्यांमध्ये पावसाची सततधार कायम आहे. गडचिरोली जिल्ह्यात पूर परिस्थिती कायम असून तब्बल 25 मार्गावरील वाहतूक बंद आहे. जिल्ह्यात बुधवारपर्यंत शाळा महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली. गडचिरोलीत पावसाचा जोर कायम असून तब्बल 33 मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद करण्यात आली आहे. बुलडाणा जिल्ह्यातही पाऊस पुन्हा जोमात परतला. कवठळ मंडळात सर्वाधिक ११०.५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. सोबतच इतरही काही मंडळांमध्ये तुफान पाऊस झाला आहे. वाशीम जिल्ह्यात सर्वदूर अतिवृष्टी होत आहे.नदीनाले ओसंडून वाहत आहेत. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा दोन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com