विदर्भात उन्हाच्या झळा तापदायक

विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा चांगल्याच तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, चंद्रपूर आणि बह्मपूरी येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
Weather Report
Weather Report Agrowon

पुणे - विदर्भ, उत्तर महाराष्ट्रात उन्हाच्या झळा (Heat Wave) चांगल्याच तापदायक ठरत आहे. मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये अकोला, चंद्रपूर आणि बह्मपूरी येथे देशातील उच्चांकी ४४.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. राज्यात आज (ता. २०) उन्हाचा चटका (Heat Wave In State) कायम राहील. उद्यापासून (ता. २१) वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे.

राज्यात उन्हाची ताप वाढल्याने दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे असह्य होत आहे. किमान तापमानात वाढ (Increase In Temperature) झाल्याने रात्रीच्या वेळी उकाडा वाढला आहे. अनेक ठिकाणी तापमान ४२ अंशांच्या पुढे गेले आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमानाचा पारा ३१ ते ४१ अंशांच्या दरम्यान आहे. आज (ता.२० विदर्भासह उत्तर महाराष्ट्र, मराठवाड्यात चटका कायम राहण्याची शक्यता आहे.

दक्षिण तमिळनाडूच्या किनाऱ्यालगत चक्राकार वाऱ्यांची स्थिती कायम आहे. तेलांगणापासून तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. उद्यापासून (ता. २१) राज्यात पुन्हा विजा, मेघगर्जनेसह, वादळी पावसाला पोषक हवामान होत आहे. कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी वादळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

मंगळवारी (ता. १९) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये राज्यात विविध ठिकाणी नोंदले गेलेले कमाल तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) -

पुणे ३८.८, नगर ४२.१, धुळे ४१.०, जळगाव ४३.१, कोल्हापूर ३६.१, मालेगाव ४३.०, महाबळेश्वर ३१.६, नाशिक ३७.५, निफाड ३८.५, सांगली ३७.४, सातारा ३८.४, सोलापूर ४२.०, सांताक्रूझ ३३.१, डहाणू ३४.१, रत्नागिरी ३४.२, औरंगाबाद ४०.७, नांदेड ४१.६, परभणी ४२.४, अकोला ४४.२, अमरावती ४२.८, बुलडाणा ४१.३, ब्रह्मपुरी ४४.२, चंद्रपूर ४४.२, गोंदिया ४२.०, नागपूर ४३.६, वर्धा ४३.८, वाशीम ४२.५, यवतमाळ ४२.२.

गुरुवारी (ता.२१) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये देशभरातील कमाल तापमानाचा अंदाज (सौजन्य - हवामान विभाग)

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com