धुळ्यात पैसेवारीचा मुद्दा तापला

शिंदखेडा तालुक्यातील वेगवेगळी पर्जन्य परिस्थिती लक्षात घेता लावलेली पैसेवारी चुकीची व अन्यायकारक आहे.
Agriculture
AgricultureAgrowon

धुळे ः शिंदखेडा तालुक्यातील वेगवेगळी पर्जन्य (Rainfall) परिस्थिती लक्षात घेता लावलेली पैसेवारी (Paisewari) चुकीची व अन्यायकारक आहे. त्यामुळे या पैसेवारी यादीस आमची हरकत असून, अंतिम यादी ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करावी अन्यथा जनआंदोलन करू, असा इशारा काँग्रेसने दिला. मागणीसाठी शिंदखेडा तहसील कार्यालयासमोर निदर्शने केली, मागणीचे निवेदन तहसीलदारांना दिले.

Agriculture
Kharif Season : सातारा जिल्ह्यातील खरीप पैसेवारी ५० पेक्षा अधिक

यापूर्वी आमदार जयकुमार रावल यांनी यासंबंधी निवेदन दिले होते. पैसेवारीचा मुद्दा धुळ्यात तापू लागल्याचे दिसत आहे. शिंदखेडा तालुक्यातील पर्जन्य परिस्थिती सर्व मंडळांत (सर्कल) वेगवेगळी आहे. तालुक्यात ९२ टक्के पावसाची नोंद झाली आहे. बऱ्याच मंडळांत खूप कमी पाऊस झालेला असताना पैसेवारी चुकीची करण्यात आली आहे. बऱ्याच ग्रामपंचायतींनी विहीर अधिग्रहणाचे प्रस्ताव दाखल केले आहेत.

Agriculture
Drought : शिंदखेडा तालुक्यातील पैसेवारी अन्यायकारक

संपूर्ण तालुक्यात दुष्काळसदृश परिस्थिती असताना पैसेवारीकडे पाहता तालुक्यात जलमय स्थिती दाखविण्यात आली आहे. याउलट तालुक्यात काही भागांत अतिवृष्टी झालेली असताना या तालुक्याच्या अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने कुठलीही मदत अथवा धोरण जाहीर न केल्यामुळे अन्याय केलेला आहे.

दरम्यान, शिंदखेडा तहसीलदारांनी तालुक्यातील ग्रामपंचायत व गावनिहाय सुधारित पैसेवारी प्रसिद्ध केलेली असून, या पैसेवारीवर ग्रामपंचायत व गावनिहाय १५ दिवसांत हरकती घेण्याबाबत आदेशित केले आहे.

२७ ऑक्टोबरच्या तहसीलदारांच्या आदेशानुसार १०९ गावांची खरीप पिकांची व ३४ गावांची रब्बी पिकांची पैसेवारी प्रसिद्ध करण्यात आली आहे. या यादीस आमची जाहीर हरकत आहे. अंतिम यादी ५० पेक्षा कमी पैसेवारी जाहीर करण्यात यावी, अन्यथा तालुक्यात जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसने निवेदनातून दिला.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्यामकांत सनेर, रावसाहेब पवार, प्रा. सुरेश देसले, प्रकाश पाटील, सुनील चौधरी, दीपक देसले, राजेंद्र देवरे, विशाल पवार, पांडुरंग माळी, नरेंद्र पाटील, भाईदास निळे, डॉ. इग्रीस कुरेशी, इरफान खान, दीपक अहिरे, संदीप थोरात, किरण थोरात, पंकज चव्हाण, सोनू झालसे, पाववा कोळी, संजय माळी, उमेश बाढीले, भाईदास मिल, श्यामकांत पाटील, निळकंठ पाटील यांच्यासह इतर पदाधिकारी, शेतकऱ्यांनी मागणीचे निवेदन दिले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com