पावसाच्या आकडेवारीचा मुद्दा विधानसभेत

पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाची आकडेवारी सरकारी संकेतस्थळावरून अचानक बंद केल्याच्या ‘ॲग्रोवन’च्या वृत्ताचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शून्य प्रहरात हरकतीच्या मुद्द्याद्वारे या प्रश्नाला हात घातला.
Assembly Monsoon Session
Assembly Monsoon SessionAgrowon

मुंबई : पीकविमा योजनेचा (Crop Insurance Scheme) लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेल्या पावसाची आकडेवारी (Rainfall Statistic) सरकारी संकेतस्थळावरून अचानक बंद केल्याच्या ‘ॲग्रोवन’च्या (Agrowon Impact) वृत्ताचे पडसाद विधानसभेत उमटले. विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी शून्य प्रहरात हरकतीच्या मुद्द्याद्वारे या प्रश्नाला हात घातला. मात्र, सभागृहात कृषिमंत्री अब्दुल सत्तार (Abdul Sattar) अनुपस्थित असल्याने या विषयावर चर्चा झाली नाही.

Assembly Monsoon Session
Crop Damage : वर्धा जिल्ह्यात १२२ कोटी रुपयांचे नुकसान

अतिवृष्टीमुळे राज्यात पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची भरपाई मिळण्यासाठी प्रत्येक मंडलात एक असे पर्जन्यमापक यंत्र बसविले आहे. याबाबतही अनेक आमदारांनी आक्षेप घेतला होता. आमदार कैलास पाटील यांनी आठवडा प्रस्तावावर बोलताना पर्जन्यमापक यंत्राच्या सदोष मापनाचा मुद्दा उपस्थित केला होता. असे असताना सरकारी संकेतस्थळावरून दिली जाणारी हवामानविषयक माहिती बंद करण्यात आली. याबाबत संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. हाच मुद्दा विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत मांडला.

Assembly Monsoon Session
Crop Insurance : पाच पिकांच्या पेरणी क्षेत्रापेक्षा विमा संरक्षित क्षेत्र अधिक

पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी सरकारी संकेतस्थळावरील आकडेवारीचा उपयोग केला जातो. मात्र, हीच आकडेवारी शेतकऱ्यांना कळत नसल्याने अडचणी आल्या आहेत, असे सांगत पवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घ्यावी, अशी मागणी केली. पावसाची माहिती सरकार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांना पाठविली जाते. ती तातडीने माहिती देण्यास सुरुवात करावी, असे सांगितले.

मेंढ्या मृत्यू प्रकरणाची दखल

अमरावती येथील काळा खडक आणि जनुना येथील शेकडो मेंढ्या मृत्यूमुखी पडल्याचा मुद्दाही विरोधी पक्षनेते पवार यांनी उपस्थित केला. संसर्गजन्य आजार होऊनही पशुसंवर्धन विभागाने अद्याप कुठलीही कारवाई केलेली नाही. तेथे पाहणीसाठी अधिकारी गेलेले नाहीत, असा आरोपही केला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com