माॅन्सूनची स्थिती जैसे थे!

देशातील माॅन्सूनचा प्रवास खोळंबला. तीन दिवसांपासून माॅन्सून एकाच जागेवर रेंगाळला.
माॅन्सूनची स्थिती जैसे थे!
MonsoonAgrowon

पुणेः देशातील माॅन्सूनचा प्रवास (Journey Of Monsoon ) खोळंबला. तीन दिवसांपासून माॅन्सून (Monsoon Update) एकाच जागेवर रेंगाळला. तर राज्यासह देशभरात ठिकठिकाणी हलक्या सरी (Light Rain) पडत आहेत. तर काही भागांत चांगला पाऊस झाला. झालेल्या पावसावर शेतकऱ्यांनी पेरण्या (Sowing) केल्याचे सरकारच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सध्या माॅन्सूनची सीमा पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा आणि चुर्क या भागांत कायम आहे.

राज्यात काही भागांत माॅन्सून सरी बरसत आहेत. मात्र सर्वदूर जोरदार पाऊस अद्याप झालेला नाही. राज्यातील शेतकरी पावसाकडे डोळे लावून आहेत. मात्र माॅन्सूनने राज्य व्यापून पाच दिवस झाले तरी संपूर्ण राज्यात माॅन्सून सक्रिय झाला नाही. सध्या जोरदार पावसाला पोषक वातावरण निर्मिती झालेली नाही. सोमवारी माॅन्सूने मध्य प्रदेश, छत्तीगड, बंगालचा उपसागर, ओडिशा, पश्चिम बंगाल आणि आंध्र प्रदेश व्यापून बिहार आणि उत्तर प्रदेशच्या आणखी काही भागांतही प्रगती केली होती. मात्र त्यानंतर माॅन्सूनचा प्रवास थांबला. सध्या पोरबंदर, बडोदा, शिवपुरी, रेवा या भागांत माॅन्सूनची दिशा कायम आहे.

संपूर्ण राज्यात माॅन्सून सक्रिय झाला नाही. मात्र अनेक भागांत पावसाच्या सरी पडत आहेत. बुधवारी कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात काही ठिकाणी जोरदार पाऊस झाला. तर उर्वरित राज्यात हलका पाऊस पडला. राज्यात पुढील आठवड्यात माॅन्सूनचा पाऊस वाढू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com