Polyhouse : पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा वाढवावी

पवनानगर फूल उत्पादक संघाची मागणी
Polyhouse
PolyhouseAgrowon

पुणे : पॉलिहाऊस उभारणीची मर्यादा किमान पाच एकरांपर्यंत करण्यात यावी. तसेच कृत्रिम फुलांवर बंदी घालावी, यासह विविध मागण्या केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर (Narendra singh Tomar) यांच्याकडे मावळमधील पवनानगर फूल उत्पादक (Flower Producer) संघाने केल्या आहेत.

Polyhouse
Indian Agriculture : गुणवत्ता नियंत्रण अधिकारी पदासाठी फुटले भाव

केंद्रीय कृषिमंत्री तोमर हे नुकतेच राज्यातील शेतीविषयक समस्या जाणून घेण्यासाठी पुणे येथे आले असता त्यावेळी संघाच्या मंडळाने भेट घेऊन मागण्याचे निवेदन दिले होते. या वेळी पवनानगर फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष मुकुंद ठाकर, ज्ञानेश्वर आडकर, दिलीप काळे, तानाजी शेंडगे, चंद्रकांत कालेकर, हेमंत कापसे, जयसिंग हुलावळे, ज्ञानेश्वर ठाकर, रामदास पवार आदी उपस्थित होते.

मावळ तालुक्यात गुलाब फुलांसाठी पोषक वातावरण असल्याने या फुलांच्या निर्यातीसाठी केंद्र शासनाकडून सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले. तसेच कृषी आयुक्तांनी शेतकऱ्यांच्या समस्या थेट बांधावर जाऊन समजून घ्याव्यात. तसेच कृषी मंत्रालयात या समस्या सोडविण्यासाठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सूचना दिल्या आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली.

या मागण्या केल्या आहेत.

- पॉलिहाऊस उभारणीचा खर्च चालू बाजारभावाप्रमाणे धरावा.

- पॉलिहाऊस उभारणीचे स्टिलवरील जीएसटी १८ टक्केवरून ५ टक्के करावा.

- पॉलिहाऊसचे अनुदान मिळण्याची प्रक्रिया सुलभ करावी.

- मावळ तालुक्यामध्ये लिलाव केंद्र उभारावे.

- विमा पॉलिसीमध्ये बदल करावा.

- माल निर्यात करताना शेतकऱ्यांना येणाऱ्या अडचणी सोडवाव्यात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com