Cotton Production : कापूस उत्पादकता वाढीसाठी चिंतनाची गरज ः डॉ. मायी

बांगलादेशमध्ये एक बोंड कापूस उत्पादन होत नाही. मात्र त्या भागात वस्त्रोद्योग सर्वाधिक आहे. त्यामागे कमी दरात उपलब्ध होणारे कामगार हे मुख्य कारण आहे.
Cotton Production
Cotton ProductionAgrowon

नागपूर : जगात कापसाखाली सर्वाधिक क्षेत्र (Cotton Acreage) भारतात असले तरी उत्पादकतेच्या (Cotton Productivity) बाबतीत मात्र भारत पिछाडीवर आहे. त्यातही इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्राची आणि विदर्भाची उत्पादकता अत्यल्प असल्याने उत्पादकता वाढीसाठी चिंतन होण्याची गरज असल्याचे मत शास्त्रज्ञ निवड मंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. चारुदत्त मायी (Dr. Charudatt Mayi) यांनी व्यक्त केले.

Cotton Production
Cotton Rate : देशांतर्गत बाजारात कापूस दरात सुधारणा

केंद्रीय कापूस संशोधन संस्थेच्या वतीने गुरुवारी (ता. २४) आयोजित राज्यस्तरीय कापूस मेळाव्यात ते बोलत होते. डॉ. मायी पुढे म्हणाले, की बांगलादेशमध्ये एक बोंड कापूस उत्पादन होत नाही. मात्र त्या भागात वस्त्रोद्योग सर्वाधिक आहे. त्यामागे कमी दरात उपलब्ध होणारे कामगार हे मुख्य कारण आहे. बांगलादेशला भारतातून सर्वाधिक कापूस निर्यात होतो. मात्र जागतिकस्तरावर भारताची उत्पादकता कमी आहे. ती वाढविण्यासाठी संशोधनात्मक पातळीवर प्रयत्न आणि तंत्रज्ञान उपलब्धता गरजेची आहे.

संस्थेचे संचालक डॉ. वाय.जी. प्रसाद यांनी उत्पादकता वाढीसाठी येत्या काळात करण्यात येणाऱ्या संशोधनात्मक कार्याची माहिती प्रास्ताविकातून दिली. केंद्रीय कापूस संशोधन संस्थेचे तज्ज्ञ डॉ. एम. वेणुगोपालन यांनी गुलाबी बोंड अळीच्या नियंत्रणासाठी फरदड न घेण्याचे आवाहन केले.

Cotton Production
Cotton export: आंतरराष्ट्रीय बाजारात भारतीय कापसाची मागणी का घटली ?

डॉ. डी. ब्लेज डिसूजा यांनी खताचा अतिरेकी वापर टाळण्यासाठी माती परीक्षणावर भर देण्याचा सल्ला दिला. डॉ. विजय वाघमारे यांनी २०१० नंतर देशात गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढल्याचे सांगितले. सद्यःस्थितीत किडींची प्रतिकारशक्ती वाढली असून जास्त कीटकनाशकाचा वापर झाल्यास झाड कमजोर होते आणि कीडरोगाला बळी पडते, असे मत मांडले.

डॉ. नंदिनी गोगटे यांनी यापुढील काळात वातावरणात होणारे बदल आणि यादरम्यान गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव केव्हा होतो हे केंद्रीय कापूस संशोधन संस्था अभ्यासत असल्याचे सांगितले. त्या आधारे गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव होणार असल्याचा अंदाज आधीच वर्तविणे शक्य होणार आहे. वर्धा येथील सुभाष कांबळी, अजंती येथील शेषराव भोयर या शेतकऱ्यांनी या वेळी कापूस व्यवस्थापन पद्धतीविषयक अनुभव कथन केले.

शेतकऱ्यांनी सघन लागवडीचे केले आवाहन

मालवाडा (जि. अकोला) येथील शेतकरी दिलीप ठाकरे या वेळी म्हणाले, की शेतकऱ्यांमध्ये तांत्रिक माहितीचा अभाव आहे. त्यामुळेच कृषी सेवा केंद्रधारकांवर त्यांना अवलंबून राहावे लागते. परिणामी शेतकऱ्यांनी शेती करताना अपग्रेड राहिले पाहिजे. सघन लागवड हा उत्पादकता वाढीचा सक्षम पर्याय असून, या पद्धतीमधील तांत्रिक बारकावे त्यांनी या वेळी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com