co-operation : सहकारातील बदल आत्मसात करण्याची गरज

काळानुरूप सहकार क्षेत्राचे स्वरूप बदलत असून, हे बदल आत्मसात करताना सहकारी संस्थांनी ही चळवळ दृढ करावी, असे आवाहन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले.
co-operation
co-operation Agrowon

नाशिक : सहकार क्षेत्र (co-operation Sector) संपविण्याचे कटकारस्थान सुरू आहे, अशी चर्चा गेल्या काही काळापासून सुरू झालेली आहे. परंतु दुसरीकडे केंद्र शासनाकडून (Central Governmet) सहकार मंत्रालय सुरू करण्यात आलेले आहे. काळानुरूप सहकार क्षेत्राचे स्वरूप बदलत असून, हे बदल आत्मसात करताना सहकारी संस्थांनी ही चळवळ दृढ करावी, असे आवाहन ‘सकाळ’च्या उत्तर महाराष्ट्र आवृत्तीचे संपादक डॉ. राहुल रनाळकर यांनी केले.

co-operation
हरितगृहांतील वायू उत्सर्जन कमी करण्याची गरज

नाशिक जिल्हा पगारदार कर्मचारी पतसंस्थेच्या नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी अध्यक्षीय मनोगतात डॉ. रनाळकर बोलत होते. या वेळी सन्मान सोहळा व सहकार परिषद पार पडली. महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी हरिभाऊ वाकचौरे, जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे उत्तमराव गांगुर्डे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे विभागीय सचिव दिलीप थेटे, जिल्हा सेवानिवृत्त सेवक असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र थेटे, न्यायालयीन कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दादाभाऊ निकम, जिल्हा परिषद परिचर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष विलास शिंदे, पशुवैद्यकीय व्यावसायिक कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष भगवान पाटील, जिल्हा परिषद लिपिकवर्गीय कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रमोद निरगुडे, उपाध्यक्ष किरण निकम, मार्गदर्शक रवींद्र आंधळे, शासकीय-निमशासकीय लिपिक संवर्गीय हक्क परिषदेचे जिल्हाध्यक्ष नीलेश देशमुख, दिलीप सलदे, मंदाकिनी पवार-निकम, बाळासाहेब ठाकरे, संदीप पाटील आदी उपस्थित होते.
डॉ. रनाळकर म्हणाले, की सध्याच्या स्थितीत भागीदारी हे सहकाराचे बदलते रूप आहे. जगभरात सहकाराचा बोलबाला असून, महाराष्ट्र ही सहकाराची भूमी असल्याचा अभिमान बाळगायला हवा. निवडणुका संपल्या असताना आता पदाधिकाऱ्यांनी आपसांतील कटुता, वाद-विवाद विसरून सभासदहितासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.

co-operation
कृषी क्षेत्राला ऊर्जा क्षेत्राकडे परावर्तित करण्याची गरज : गडकरी

प्रास्ताविकात गांगुर्डे म्हणाले, की सक्षम सहकार चळवळ उभी करण्यासाठी प्रत्येकाने योगदान देण्याची आवश्यकता आहे. ठाकरे म्हणाले, सहकारी संस्थांवर युवा नेतृत्वाला संधी देण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी विविध उपक्रम, कामकाजात तरुणांनी सहभागी झाले पाहिजे. सहकार क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी सहकार परिषद होत असल्याचे त्यांनी नमूद केले. कार्यक्रमादरम्यान मंगेश जगताप, ज्ञानेश्वर कासार, बाळासाहेब ठाकरे, मंदाकिनी पवार-निकम, डॉ. प्रशांत खैरे, भगवान पाटील, मालेगावचे श्री. हिरे, जितेंद्र पाटील, अंबादास पाटील यांचादेखील सत्कार करण्यात आला.

या संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचा कार्यक्रमात झाला सत्कार
नाशिक जिल्हा परिषद, जिल्हा रुग्णालय, जिल्हा न्यायालयीन, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, जिल्हा पशुसंवर्धन, जिल्हा हिवताप, जिल्हा आदिवासी विकास विभाग, जिल्हा ग्रामसेवक, इगतपुरी तालुका पतसंस्था आणि या सहकारी पतसंस्थांवरील विजयी संचालकांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com