सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप घोष

इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरची स्थापना १९८३ मध्ये प्रा. एस.पी. राय चौधरी, प्रा. वाय.एस. अहवालात, प्रा. गोपाल स्वरुप, डॉ. एस.पी. घोष आणि डॉ. ओ. एस. राजेश यांनी केली.
Dr. Dilip Ghosh
Dr. Dilip GhoshAgrowon

नागपूरः इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरच्या नवीन कार्यकारी मंडळाची घोषणा नुकतीच करण्यात आली. केंद्रीय लिंबूवर्गीय संशोधन संस्थेत या निमित्ताने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरच्या सर्व आजीवन सदस्यांनी मतदानाचा हक्‍क बजावून या प्रतिष्ठित वैज्ञानिक सोसायटीच्या नवीन कार्यकारी मंडळाची निवड केली. सोसायटीच्या अध्यक्षपदी डॉ. दिलीप घोष यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

इतर कार्यकारिणी सदस्यांमध्ये नाबार्डचे माजी सहव्यवस्थापक डॉ. एस. एस. मलानी, नागपूर कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. डी. एम. पंचभाई, लिंबूवर्गीय संशोधन संस्थेचे मुख्य शास्त्रज्ञ डॉ. आर. के. सोनकर (सचिव), डॉ. आशुतोष मुरकुटे (सहसचिव), डॉ. ए. के. दास यांचा समावेश आहे.

सल्लागार सदस्यांमध्ये लुधियाना येथील पंजाब कृषी विद्यापीठाचे वरिष्ठ फलोत्पादन शास्त्रज्ञ डॉ. एच. एस. रतनपाल, डॉ. के. पी. भगत, डॉ. दिनेश पैठणकर, तिरुपती येथील श्री वेंकटेश्‍वर विद्यापीठाचे प्रा. डी. व्ही. आर. साई गोपाल, आसाम कृषी विद्यापीठाचे प्रा. डॉ. आर. के. काकोटी यांची निवड करण्यात आली. या नवीन कार्यकारी मंडळाचा कार्यकाळ तीन वर्षांसाठी म्हणजे २०१५ पर्यंत आहे.

सोसायटीचे मावळते अध्यक्ष डॉ. एम. एस. लदानिया यांनी लिंबूवर्गीय उद्योगाच्या विकासात आयएससीची भूमिका अधोरेखित केली आणि नवनियुक्‍त अध्यक्ष डॉ. दिलीप घोष यांच्याकडे सोसायटीचा कार्यभार सोपवला.

Dr. Dilip Ghosh
शेतकऱ्यांना यंदा मिळणार ४२ हजार कोटींची ‘एफआरपी’

संस्था लिंबूवर्गीय फळपिकांच्या विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरण तयार करणे आणि त्याच्या शिफारशी सामाईक केल्या जातात. लिंबूवर्गीय संशोधकांना सोसायटी विविध पुरस्कार आणि फेलोशिप प्रदान करते. नवनियुक्‍त अध्यक्ष डॉ. घोष यांनी जुलै २०२२ मध्ये दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय लिंबूवर्गीय परिषद (आभासी पद्धतीने) आयोजित करण्याची घोषणा केली.

जानेवारी २०२३ मध्ये सिट्रीकल्चर राष्ट्रीय परिषद आणि ऑक्‍टोंबर २०२३ मध्ये आशियाई लिंबूवर्गीय कॉंग्रेस घेण्यात येईल. यामध्ये भारत आणि परदेशातील लिंबूवर्गीय फळपिकातील तज्ज्ञ सहभागी होतील.

इंडियन सोसायटी ऑफ सिट्रीकल्चरची स्थापना १९८३ मध्ये प्रा. एस.पी. राय चौधरी, प्रा. वाय.एस. अहवालात, प्रा. गोपाल स्वरुप, डॉ. एस.पी. घोष आणि डॉ. ओ. एस. राजेश यांनी दिल्ली येथे सोसायटी अधिनियमांतर्गत केली. विदर्भातील लिंबू उत्पादकांचे हित लक्षात घेता आयएससीचे मुख्यालय १९९७ मध्ये नागपुरात हलविण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com