Lumpy Skin : जिल्ह्यात ‘लम्पी स्कीन’ बाधिताची संख्‍या २६ वर

मागील चार दिवसांत लम्पी आजाराच्या बाधित जनावरांची संख्या २६ वर पोहोचली आहे. त्यामुळे या आजारामध्ये वाढ होत असल्याने पशुसंवर्धन विभाग अधिक सतर्क झाला असून बाधित जनावरांच्या ठिकाणापासून पाच किमीपर्यंतच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे.
Lumpy Skin
Lumpy SkinAgrowon

ठाणे : दिवसेंदिवस ठाणे(Thane Lumpy News) जिल्ह्यातील ग्रामीण भागासह शहरी भागात लम्पी आजाराने (Lumpy Skin Disease) बाधित जनावरांच्या संख्येत वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे. मागील चार दिवसांत लम्पी आजाराच्या बाधित जनावरांची संख्या २६ वर पोहोचली आहे.

Lumpy Skin
Sharad Pawar : ‘रयत’च्या पाठीशी नगरकरांचा मजबूत पाठिंबा : शरद पवार

त्यामुळे या आजारामध्ये वाढ होत असल्याने पशुसंवर्धन (Department of Animal Husbandry) विभाग अधिक सतर्क झाला असून बाधित जनावरांच्या ठिकाणापासून पाच किमीपर्यंतच्या परिसरातील जनावरांचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. जिल्ह्यातील शहापूर, भिवंडी, अंबरनाथ आणि बदलापूर येथील सात हजार ७६ पैकी सात हजार जनावरांचे लसीकरण केले.

मागील काही दिवसांपासून ठाणे जिल्ह्यात लम्पीचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे दिसून येत आहे. सोमवारी जिल्ह्यातील तीन तालुक्यांमधील जनावरांमध्ये लम्पीची लागण झाल्याचे समोर आले. यामध्ये तालुक्यातील नऊ गायी, भिवंडीत तीन, पशू सर्व चिकित्सालय शेलार येथे १० जनावरांमध्ये, तालुका लघु चिकित्सालय शहापूर येथील दोन व बदलापूर तालुका लघु चिकित्सालय येथील दोन जनावरांचा यामध्‍ये समावेश आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com