जिल्हा परिषद सदस्यांची संख्या किमान ५० होणार

नोव्हेबर २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारने जि. प. सदस्यांची संख्या ५० वरून ५५ आणि जास्तीत जास्त ७५ वरून ८५ करण्यास मान्यता दिली होती. राज्यात सत्तांतर होताच शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) निर्णयाला धक्का दिला आहे.
Local Body Members
Local Body MembersAgrowon

मुंबई : ग्रामीण भागातील घटत्या लोकसंख्येमुळे जिल्हा परिषद (ZP) सदस्यांची संख्या किमान ५० आणि जास्तीत जास्त ७५ करण्यास बुधवारी (ता. ३) मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ (Eknath Shinde) शिंदे होते.

नोव्हेबर २०२१ मध्ये महाविकास आघाडी सरकारने जि. प. सदस्यांची संख्या ५० वरून ५५ आणि जास्तीत जास्त ७५ वरून ८५ करण्यास मान्यता दिली होती. राज्यात सत्तांतर होताच शिंदे सरकारने महाविकास आघाडी सरकारच्या (Mahavikas Aaghadi) निर्णयाला धक्का दिला आहे.

महाविकास आघाडी सरकारने मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेतल्यानंतर हिवाळी अधिवेशनात त्यास मंजुरी घेतली होती. मात्र शिंदे सरकार या निर्णयाचा अध्यादेश काढणार आहे. या निर्णयामुळे राज्यातील जिल्हा परिषद सदस्यांची संख्या २२४८ वरून दोन हजारांवर येणार आहे.

राज्यातील सर्वांत कमी लोकसंख्या असलेल्या जिल्ह्याला किमान ५० जागा, तर सर्वांत जास्त लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात ७५ जागा असतील. यासाठी जिल्हा परिषद अधिनियम १९६१ मध्ये सुधारणा करण्यात येणार आहे. या निर्णयासंदर्भात अद्यादेश जारी करण्यात येणार आहे.

Local Body Members
भटक्या कुत्र्यांची समस्या कधी सुटणार?

वर्धा बॅरेजसाठी ५६५,तर ‘लेंडी’साठी १८७ कोटी

यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव तालुक्यातील वर्धा बॅरेज उपसा सिंचन योजनेच्या ५६५कोटी, ८७ लाख रुपये किमतीच्या कामांना मंत्रिमंडळ बैठकीत सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली. जव्हार तालुक्यातील मौजे हिरडपाडा येथील लेंडी लघू पाटबंधारे प्रकल्प पूर्ण करण्यासाठी १८७ कोटी ०४ लाख रुपयांच्या कामांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यात आली.

अमृत संस्थेसाठी पदमान्यता

खुल्या प्रवर्गातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी स्थापन करण्यात आलेल्या महाराष्ट्र संशोधन, उन्नत व प्रशिक्षण प्रबोधन (अमृत) या संस्थेच्या ३ नियमित व १७ कंत्राटी पदांना मान्यता देण्यात आली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com