Marketing Federation : पणन महासंघाच्या उपविधी दुरुस्तीचा मुहूर्त टळला

पणन महासंघाच्या निवडणुकीत ज्या सभासदांचा २५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार सध्याच्या उपविधीनुसार आहे.
Marketing Federation
Marketing Federation Agrowon

मुंबई : राज्य सहकारी पणन महासंघाच्या निवडणुकीत (Marketing Federation Election) सर्व सभासदांना मतदानाची परवानगी द्यावी. त्यासाठी उपविधी दुरुस्तीची मागणी सर्वसाधारण सभेत करण्यात आली.

मात्र हा विषय आयत्या वेळी येऊ शकत नाही. त्यासाठी लेखी प्रश्‍न द्या, त्यावर पुढील सभेत चर्चा करून निर्णय घेऊ, असे आश्‍वासन सहकारमंत्री अतुल सावे (Cooperation Minister Atul Save) यांनी दिले.

महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक तथा प्राधिकृत अधिकारी सुधाकर तेलंग यांच्या हस्ते उपस्थितांचे स्वागत करण्यात आले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे ६४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत सावे बोलत होते. या वेळी धान खरेदी बारदांनाचा पुरवठा आणि प्रलंबित पैसे, वाहतुकीची थकीत रक्कम, आधारभूत किमतीसाठीचे प्रस्ताव आणि अन्य विषयांवर चर्चा झाली.

पणन महासंघाच्या निवडणुकीत ज्या सभासदांचा २५ लाख रुपयांची वार्षिक उलाढाल आहे, त्यांनाच मतदानाचा अधिकार सध्याच्या उपविधीनुसार आहे.

त्यामुळे महासंघाच्या निवडणुकीची प्रक्रिया संकुचित झाल्याचे सांगत काही सभासदांनी आयत्या वेळच्या विषयात उपविधी दुरुस्तीची मागणी केली.

मात्र, हा मुद्दा आयत्यावेळच्या विषयात येऊ शकत नाही. यासाठी आगावू नोटीस द्यायला हवी. पुढील सभेत हा विषय चर्चेला आल्यास त्याबाबत विचार करण्याचे आश्‍वासन देण्यात आले. सावे यांनी महासंघाच्या सदस्यांचे प्रलंबित प्रश्‍न मार्गी लावण्याचे आश्‍वासन दिले.

राज्य सरकारने प्रोत्साहन अनुदानाचा प्रश्‍न मार्गी लावला असून, ३१ मार्चपूर्वी सर्व शेतकऱ्यांचे पैसे मिळतील. राज्यातील खतनिर्मिती कारखाने बंद असून खतांच्या पुरवठ्यात अडथळा येत आहे.

याबाबत केंद्रीय खते व रसायन मंत्र्यांशी बोलून हा प्रश्‍न मार्गी लावू. ‘नाफेड’च्या वाढीव केंद्रांबाबत केंद्रीय स्तरावर प्रयत्न करू, असे आश्‍वासन सावे यांनी दिले.

व्यवस्थापकीय संचालक सुधाकर तेलंग, प्रशासन विभागाचे सरव्यवस्थापक प्रभाकर सावंत, माजी मंत्री सतीश पाटील, मोहनराव अंधेरे, आबासाहेब पाटील, भागवतराव धस, आबासाहेब काळे, मालमत्ता विभागाचे सरव्यवस्थापक नितीन यादव, ‘नाफेड’चे सरव्यवस्थापक डॉ. अतुल नेरकर आदी उपस्थित होते.

Marketing Federation
Agriculture Department : पणन संचालक पदी सुधीर तुंगार?

पणन विभागाचे सहसचिव डॉ. सुग्रीव धपाटे म्हणाले, ‘सध्या मानवी जीवनशैली विचित्र पद्धतीने बदलल्याने अनेक गंभीर आजारांना सामोरे जावे लागत आहे.

हे आजार आधी का नव्हते याचा शोध घेतल्यात आहारात तृण आणि भरडधान्यांचा समावेश असल्याचे लक्षात येते. त्यामुळे यंदाचे वर्ष भरडधान्य दिवस साजरे होत आहे.

हैदराबाद येथील खादर वली यांनी भरडधान्याचा प्रसार केला. त्यांना मिलेट मॅन म्हटले जाते. या वर्षात भरडधान्य पिकविणारे महाराष्ट्र, भारत आणि जागतिक पातळीवर ठिकाणे शोधणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. यात औषधी आणि गुणकारी पोषक तत्वे असल्याने आगामी पिढीसाठी ते खूप महत्त्वाचे आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com