अमरावती जिल्ह्यातील ३९० किमी रस्त्यांची दुर्दशा

ऑगस्ट महिन्यातदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. या पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील ३९० किलोमीटर रस्त्यांची (Roads) दुर्दशा झाली आहे. याशिवाय १०८ पूल क्षतिग्रस्त झाले आहेत.
Roads
Roads Agrowon

अमरावती : संततधार पाऊस व अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात ग्रामीण भागातील रस्त्यांची पुरती वाट लागली आहे. सुमारे ३९० किलोमीटर रस्त्याची चाळण झाली असून, १३६ पूलही क्षतिग्रस्त झाले आहेत. या दोन्ही कामांच्या दुरुस्तीसाठी १३१ कोटी १७ लाख ५० हजार रुपयांचा खर्च अपेक्षित आहे.

अमरावती जिल्ह्यात जुलै महिन्यात पावसाने विक्रम केला. याच महिन्यात अनेक तालुक्यांनी वार्षिक सरासरी गाठली तर काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीची (Heavy Rainfall) नोंद झाली. या साऱ्याचा फटका सर्वाधिक खरीप पिकांना (Kharif Crops) बसला. जुलै महिन्यातील नुकसानीचे सर्वेक्षण व पंचनाम्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आले.

त्यानंतर ऑगस्ट महिन्यातदेखील जोरदार पावसाने हजेरी लावली. या पाऊस आणि पूर परिस्थितीमुळे ग्रामीण भागातील ३९० किलोमीटर रस्त्यांची (Roads) दुर्दशा झाली आहे. याशिवाय १०८ पूल क्षतिग्रस्त झाले आहेत.

सोबतच ८,५६४ किलोमीटरच्या जिल्हा मार्गाचेही नुकसान झाले आहे. या मार्गावरील २८ पूल क्षतिग्रस्त झाल्याची माहिती बांधकाम विभागाच्या सूत्रांनी दिली. या कामाच्या दुरुस्तीसाठी ही जिल्हा परिषद बांधकाम विभागाने निधी मागणीचा प्रस्ताव शासनाकडे सादर केला आहे.

रस्ते आणि पुलाच्या दुरुस्तीसाठी १३१ कोटी १७ लाख ५० हजार रुपयांच्या निधीची गरज भासणार आहे. त्यातील किती निधी शासनाकडून मंजूर होतो याकडे ग्रामीण भागातील नागरिकांचे लक्ष लागून आहे.

तालुका न्याय रस्ते व पुलाची संख्या

- अमरावती : १९.९०--२३

- तिवसा : ८.४०--०६

- भातकुली : ५.००-- ०३

- नांदगाव : २.५०--०३

- चांदूर रेल्वे : १९.२०--१०

- धामणगाव : २२.४०--१२

- मोर्शी : १९.००--१९

- अचलपूर : ६५.००--०४

- चांदूर बाजार : ४५.४१--०२

- दर्यापूर : ७.७०--१०

- अंजनगाव : ८.००--०५

- धारणी : ३२.४०--०८

- चिखलदरा : ४६.१०--०३

- चांदूर रेल्वे : १९.२०--०२

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com