
निमगाव केतकी, जि. पुणे ः ‘‘झगडेवाडी (ता. इंदापूर) विद्युत उपकेंद्रामुळे आता आठ गावांचा वीजेचा प्रश्न कायम स्वरुपी सुटेल,’’ अशी माहिती माजी मंत्री आमदार दत्ता भरणे (Datta Bharane) यांनी दिली.
शनिवारी (ता. ९) झगडेवाडी येथील अभंगवस्ती येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत दोन कोटी २७ लाख रुपये किमतीच्या ३३/११ केव्ही विद्युत उपकेंद्राच्या कामाचे भूमीपूजन भरणे यांच्या हस्ते झाले. या वेळी जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर (Pradip Garatkar) उपस्थित होते.
भरणे म्हणाले,‘‘निमगाव केतकी (Nimgao Ketaki) केंद्रातून अपुरा व कमी दाबाने वीज पुरवठा होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह वीज ग्राहकांना सतत समस्येला तोंड द्यावे लागत होते. येथील उपकेंद्र सुरु झाल्यास झगडेवाडीसह तरंगवाडी, गोखळी, पंधारवाडी, पिटकेश्वर, सराफवाडी, रामकुंड या गावांना पूर्ण क्षमतेने वीजपुरवठा होईल. सध्या आघाडीचे सरकार नसले तरी इंदापूर तालुक्याच्या विकास कामांना कोणतीही अडचण येणार नाही. सत्तेत असताना केला तसाच विकास यापुढे चालूच राहील.’’
गारटकर म्हणाले, ‘‘येथे विद्युत उपकेंद्र व्हावे, या साठी सरपंच रूपाली झगडे व अतुल झगडे यांनी भरणे व खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याकडे अडीच वर्षे पाठपुरावा केला. राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी प्रास्ताविक केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, जिल्हा परिषद सदस्य अभिजित तांबिले, सचिन खामगळ, प्रल्हाद अभंग आदी उपस्थित होते.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.