Velchi Rate : वेलचीचा भाव २४०० रुपये किलो

भावात विक्रमी सुधारणा , प्रतिकिलो एक हजार रुपयांची वाढ
Velchi Rate
Velchi RateAgrowon

Nagpur : केंद्र सरकारने वेलचीच्या निर्यातीला (Cardamom Export) परवानगी दिली आहे. त्यामुळे वेलचीच्या निर्यातीत वाढ झाल्याने भावात सुधारणा झाली आहे. पंधरा दिवसांपूर्वी १४०० रुपये किलो असलेली वेलची (Cardamom Rate) आता २४०० रुपयांवर गेली आहे. पंधरा दिवसांत भावात प्रतिकिलो १००० रुपये सुधारणा झाली आहे.

इंधन, जीवनावश्यक वस्तू, वीज दर, सिलिंडर आणि टोल टॅक्सच्या दरवाढीसोबत आता सणासुदीच्या दिवसांत वेलचीच्या मागणीतही वाढ झाली आहे. यामुळे दरात प्रतिकिलो १००० रुपयांनी सुधारणा झाली आहे.

भारतात सर्वाधिक मसाल्याच्या पदार्थांचे उत्पादन केरळमध्ये होते. महाराष्ट्रात सर्वाधिक वेलचीची आवक केरळातूनच होते; मात्र गत महिनाभरापासून वेलचीला परदेशातून मागणी वाढली आहे. त्यातच उत्पादन घटल्यामुळे वेलचीचे दर गत एक महिन्यापासून सुधारत गेले आहेत.

Velchi Rate
Papaya Rate : नंदूरबारमध्ये पपईला नऊ रुपये प्रति किलो दर

वेलचीचे फायदे
वेलची आरोग्यासाठी महत्त्वाची आहे. अ‍ॅसिडिटी, तणाव, रक्तदाब, बद्धकोष्ठता, युरीन इन्फेक्शन, पचनाचा त्रास अशा विविध विकारांसाठी वेलची उपयुक्त आहे.

पण मसाल्याच्या पदार्थांतून वेलची बेपत्ता होण्याच्या मार्गावर असल्याने त्याचा धोका आरोग्यालाही निर्माण होऊ शकतो.


निर्यातीला केंद्राची हिरवी झेंडी
वेलचीच्या निर्यातीला केंद्र सरकारने हिरवी झेंडी दाखविली आहे. त्यामुळे निर्यात वाढली असताना देशात उत्पादनही कमी झाले आहे.

त्याचा फटका देशांतर्गत वेलचीचे दर प्रति किलो १००० रुपयांनी सुधारले आहेत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com