Silk Cocoons : जालना बाजारपेठेत रेशीम कोष खातोय भाव

आठवडाभरात ३० क्विंटल आवक; दर प्रति किलो ४२० ते ७२० रुपयांपर्यंत
Silk Cocoons
Silk Cocoons Agrowon


संतोष मुंढे ः ॲग्रोवन वृत्तसेवा
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार (APMC) समितीतील रेशीम कोष (Silk Cocoons) खरेदी बाजारपेठेत राज्यभरातून येणारे रेशीम कोष भाव खात आहेत. गत आठवडाभरात ३० क्विंटल आवक झालेल्या रेशीम कोषांना ४२० ते ७२० रुपयांपर्यंत प्रति किलो दर मिळाल्याची माहिती बाजार समितीच्या वतीने देण्यात आली.

Silk Cocoons
Silk Cocoon : रेशीम कोषांपासून कच्चे धागेनिर्मितीचा स्वयंचलित प्रकल्प

जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत साधारणतः तीन वर्षांपूर्वी प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू करण्यात आली. या रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत गतवर्षी मार्च अखेरपर्यंत ४६२ टन रेशीम कोषांची राज्यभरातून आवक झाली होती. यंदा एक एप्रिलपासून आतापर्यंत जवळपास ५५० टन रेशीम कोष ६,६७० शेतकऱ्यांकडून बाजारपेठेत आले. गतवर्षी वर्षभरात रेशीम कोषांना मिळालेला सरासरी दर ४२० रुपये प्रति किलो राहिला होता. तो यंदा आजपर्यंत सरासरी ५०० रुपयांपर्यंत प्रति किलोपर्यंत आहे. गतवर्षी रेशीम कोषांना मिळालेला सर्वाधिक दर ९०० रुपयांच्या किंचित पुढे गेला होता. यंदा तो ७२० रुपयांपर्यंत राहिला. दुसरीकडे गतवर्षी रेशीम कोषाला किमान दर १५० रुपये प्रति किलो मिळाला होता, जो यंदा आजवर २०० रुपये प्रति किलोच्या पुढेच राहिला आहे.

Silk Cocoons
Silk : जालना मार्केटमध्ये एकाच दिवशी रेशीम कोषांची विक्रमी आवक

गत आठवडाभरात जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत ३१० शेतकऱ्यांनी आपले ३० टन रेशीम कोष बाजारपेठेत विक्रीसाठी आणले. त्यामध्ये विदर्भातील सर्व जिल्ह्यांसह खानदेश व पश्‍चिम महाराष्ट्रातील पुणे, नगर, नाशिक व मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचा समावेश आहे. गतवर्षीच्या तुलनेत आजवर जवळपास ९० टन रेशीम कोष आतापर्यंत अधिक आले आहेत. यंदाची रेशीम कोष खरेदी मार्चअखेरपर्यंत सुरू राहणार आहे. कर्नाटक, पश्‍चिम बंगाल, तेलंगणा, आंध्र प्रदेश, जालना, भंडारा, औरंगाबाद व नाशिक आदी ठिकाणचे व्यापारी या बाजारपेठेतून रेशीम कोष खरेदीला प्राधान्य देत आहेत.

....
कोट...
गतवर्षीच्या तुलनेत यंदा जालना रेशीम कोष खरेदी बाजारपेठेत कोषांची आवक जास्त झाली आहे. शिवाय गतवर्षीच्या तुलनेत सरासरी दरही थोडे सुधारले आहेत. उत्तम दर्जाचे व सातत्याने रेशीम कोष आवक होत असल्याने व्यापारी बाजारपेठेत रेशीम कोष खरेदीसाठी प्राधान्य देत आहेत.
- भरत जायभाये, रेशीम कोष खरेदी बाजार अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय जालना
...
फोटो ओळ ः
जालना : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरात रेशीम कोष खरेदी बाजारात सुरू असलेली खरेदी.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com