Bacchu Kadu : शेतकऱ्यांच्या संपत्तीच्या लिलावाची प्रक्रिया उधळणार

नागपूर, वर्धा तसेच बुलडाणा जिल्हा बॅंक थकीत कर्जाची वसुली तसेच अनागोंदी कर्ज वितरण प्रक्रियेमुळे अडचणीत आल्या होत्या.
Bacchu Kadu
Bacchu KaduAgrowon

Nagpur News : अवसायानात निघालेल्या जिल्हा बॅंकेवरील प्रशासकांनी कर्ज वसुलीसाठी (Loan Recovery) थेट शेतकऱ्यांच्या संपत्ती लिलावाची नोटीस (Notice) बजावल्याने खळबळ उडाली आहे.

या प्रकारामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांनी माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांची याविषयावर भेट घेतल्यानंतर त्यांनी कडू स्टाईलने लिलावाची ही प्रक्रिया उधळून लावण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे मंगळवारी (ता.२१) होणारी लिलावाच्या प्रक्रियेदरम्यान संघर्ष होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे.

नागपूर, वर्धा तसेच बुलडाणा जिल्हा बॅंक थकीत कर्जाची वसुली तसेच अनागोंदी कर्ज वितरण प्रक्रियेमुळे अडचणीत आल्या होत्या. राज्य सरकारने या तीनही बॅंका अवसायानात आल्याचे जाहीर करून त्यांचे व्यवहार थांबविले.

त्यामुळे शेतकऱ्यांच्या पीककर्जाचा प्रश्‍न निर्माण झाला. त्यानंतर बॅंकांच्या व्यवहाराला काही अंशी परवानगी देण्यात आली. मात्र या काळात बॅंकेच्या थकीत कर्जदाराकडून वसुलीचे काम हाती घेण्यात आले.

Bacchu Kadu
शिखर बॅंकेकडून कारखान्यांना १२४ कोटींचे ‘साॅफ्ट लोन’वाटप

आता थकीत कर्जदारांना नोटीस बजावत प्रशासकांनी त्यांच्या मालमत्ता लिलावाची तारीख जाहीर केली आहे. मंगळवारी (ता.२१) जिल्ह्यातील ३०० शेतकऱ्यांच्या संपत्तीचा लिलाव केला जाणार असल्याचे सांगण्यात आले.

तशा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत. त्यामध्ये (कै.) वेणूबाई बाबूराव पाचपोहर (रा.मसोरा, नरखडे, नागपूर) यांचाही समावेश आहे. त्यांच्या संपत्ती लिलावाबाबत नोटीस बजावली गेली. वेणूबाईचे नातेवाईक सागर वामणराव पाचपोहर यांनी गुरुवारी (ता.१६) या संदर्भाने बच्चू कडू यांची नागपुरात भेट घेतली.

२०१७ मध्ये छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजनेअंतर्गंत दोन लाखांपर्यंत कर्जमाफी करण्यात आली होती. मात्र तांत्रिक कारणामुळे अनेक शेतकरी या योजनेच्या लाभापासून वंचित राहिले. त्यानंतरच्या काळात हे पोर्टल बंद करण्यात आले.

कोरोना काळात हा विषय पुन्हा मागे पडला. आता बॅंकेने थेट लिलाव करण्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे शेतीवर अवंलबिता असलेल्यांच्या अडचणी वाढणार आहेत. परिणामी कर्जमाफीचा लाभ द्यावा, अशी मागणी पाचपोहर कुटुंबीयांनी कडू यांच्याकडे केली आहे.

वनटाइम सेटलमेंट किंवा इतर योजनेतून अशा शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. या संदर्भाने मुख्यमंत्री, सहकारमंत्र्यांशी चर्चा करून तोडगा काढण्याचा प्रयत्न करणार आहे. मात्र बॅंकेच्या प्रशासकाने लिलाव प्रक्रिया राबविल्यास ती उधळून लावणार आहे.
बच्चू कडू, अध्यक्ष, प्रहार जनशक्‍ती पक्ष तसेच आमदार

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com