Land Acquisition : सुरत-चेन्नई मार्गाच्या भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ पूर्ण करावी

सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यांतून जाणार आहे.
Highway
HighwayAgrowon

सोलापूर ः सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग (Surat-Chennai National Highway) हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून, हा प्रकल्प जिल्ह्यातील चार तालुक्यांतून जाणार आहे. या प्रकल्पामुळे जिल्ह्यात नवीन उद्योग व्यवसाय निर्माण होऊन जिल्ह्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. यासाठी लवकरात लवकर भूसंपादन (Land Acquisition) करावे, अशा सूचना महसूलमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शुक्रवारी (ता.१८) येथे दिल्या.

सुरत-चेन्नई राष्ट्रीय महामार्ग व शहरातील उड्डाण पूल संदर्भात बैठक आयोजित करण्यात आली होती. या वेळी ते बोलत होते. बैठकीस खासदार डॉ. जयसिद्धेश्‍वर शिवाचार्य महास्वामी, रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सर्वश्री सुभाष देशमुख, राजेंद्र राऊत आणि सचिन कल्याणशेट्टी, समाधान आवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सोलापूर महापालिका आयुक्त पी. शिवशंकर, जिल्हा पोलिस अधीक्षक ग्रामीण शिरीष सरदेशपांडे, पोलिस आयुक्त राजेंद्र माने, अपर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे प्रकल्प संचालक सुहास चिटणीस उपस्थित होते.

Highway
Crop Damage Compensation : मिळालेली भरपाईची मदत ‘ना थरीची, ना भरीची’

पालकमंत्री विखे-पाटील म्हणाले, की सुरत-चेन्नई महामार्गासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी संपादनाबाबत नियमानुसार कार्यवाही करण्यात यावी, शेत पिकांसाठी भूमिगत वाहिनी काढण्याबाबतचे अंतर कमी राहील, याची दक्षता घ्यावी. सोलापूर शहरातील दोन उड्डाणपुलां संदर्भात शासकीय जागांबाबत तत्काळ मंत्रालयस्तरावर बैठक घेऊन निर्णय घेण्यात येईल, असेही त्यांनी या वेळी सांगितले. या वेळी सुरत-चेन्नई या राष्ट्रीय महामार्गावर करण्यात येणाऱ्या कामांची व देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती श्री. चिटणीस यांनी या वेळी दिली.

भूसंपादनाचे काम डिसेंबरअखेर पूर्ण होणार

जिल्ह्यातील बार्शी, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुक्यांतील अशी एकूण ५९ गावातील भूसंपादन करण्यात येणार आहे. मोजणीसाठी प्रत्येक तालुक्यासाठी एक अशी विविध विभागांची चार पथके तयार करून रोव्हरच्या साह्याने मोजणी करण्यात आली आहे. तसेच या पथकामार्फत जाग्यावरच शेतकऱ्या समक्ष पंचनामेदेखील करण्यात आले आहेत. भूसंपादनाचे सर्व काम डिसेंबरअखेर पूर्ण होईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com