Weather Updates: पावसाचा धुमाकूळ सुरूच

नदी-नाल्यांना पूर येऊन खरिपातील पिके (Kharip Crops) मागील चोवीस तासांपेक्षा अधिक काळापासून पाण्याखाली आहेत. यामुळे नुकसानीचा (Crop Damage) आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon

नांदेड : जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाचा धुमाकूळ (Extremely Heavy Rain) सुरूच आहे. यामुळे नद्यांना पूर येऊन खरिपातील पिके (Kharip Crops) पाण्याखाली गेली आहेत. बुधवारी (ता. १३) दिवसभर पावसाचा जोर कायम होता. यामुळे जिल्ह्यातील आठ तालुक्यांसह ३६ मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली.

गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली. दीड महिन्यातच जिल्ह्यात ५७५.४० मिलिमीटरनुसार ७०.६५ टक्के पाऊस नोंदला आहे. जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून पावसाने धुमाकूळ घातला आहे.

Crop Damage
अशी घ्याल नवजात करडांची काळजी!

यामुळे नदी-नाल्यांना पूर येऊन खरिपातील पिके (Kharip Crops) मागील चोवीस तासांपेक्षा अधिक काळापासून पाण्याखाली आहेत. यामुळे नुकसानीचा (Crop Damage) आकडा मोठा असण्याची शक्यता आहे.

जिल्ह्यात होत असलेल्या संततधार पावसामुळे सर्वच प्रकल्पातील पाणीपातळी (Water Storage) वाढली आहे. तर विष्णुपुरी प्रकल्पाचे सात दरवाजे उघडून नदीत पाणी सोडण्यात येत आहे. दरम्यान जिल्ह्यात बुधवारी दिवसभर तसेच गुरुवारी सकाळपर्यंत पाऊस सुरू होता. आठ तालुक्यांसह ३६ मंडलांत अतिवृष्टी नोंदली गेली. गुरुवारी सकाळपर्यंत जिल्ह्यात सरासरी ६५.१० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

Crop Damage
Weather Updates: पावसाचे रेड, ऑरेंज अलर्ट म्हणजे काय?

दीड महिन्यात ७० टक्के पाऊस

जिल्ह्यात जून ते सप्टेंबर या पावसाळाच्या चार महिन्यांत ८१४.४० मिलिमीटर पाऊस पडतो. यंदा प्रथमच पावसाने जोरदार सुरुवात केल्यामुळे जून ते सप्टेंबर महिन्यात पडणाऱ्या पावसाच्या तुलनेत जिल्ह्यात ५७५.४० मिलिमीटरनुसार ७०.६५ टक्के पाऊस नोंदला आहे. दीड महिन्यातच विक्रमी पाऊस नोंदला गेला आहे. पावसाळा शिल्लक असलेल्या आगामी अडीच ते साडेतीन महिन्याच्या काळात पावसाचे प्रमाण किती असेल हे येणाऱ्या काळात कळणार आहे.

जिल्ह्यात गुरुवारी सकाळपर्यंत झालेला पाऊस

(कंसात आजपर्यंतचा पाऊस)

नांदेड - ४८.२० (५७६.५०), बिलोली-८८.६० (६०२.४०), मुखेड- ४५.३०(५२५.६०), कंधार-४४.५० (५९१.७०), लोहा-४३.४० (५४९.३०), हदगाव-७४.६० (५३४), भोकर- १०९ (६६१.१०), देगलूर-३९.१० (४९३.८०), किनवट-४८.९० (५५२.३०), मुदखेड- १०७.१० (७४६.६०), हिमायतनगर-११२ (७८०.२०), माहूर- ५७.५० (४८२.६०), धर्माबाद- ६२ (५७२.८०), उमरी- १०७.९० (७००.९०), अर्धापूर- ७८.५० (५६८.५०), नायगाव- ८३.७० (५३५.४०) मिलिमीटर आहे.

अतिवृष्टी झालेले महसूल मंडळ

मुदखेड १७८.३०, भोकर १२०.५०, मोघाळी १२.५०, कुंटूर ११७.३०, उमरी ११७, सिंधी ११७, हिमायतनगर ११३.५०, सरसम ११३.५०, जवळगाव १०९, गोळेगाव १०७.५०, मातूळ ९७.५०, किनी ९७.५०, बिलोली ९६.३०, आदमपूर ९६.३०, लोहगाव ९६.३०, रामतीर्थ ९६.३०, बरबडा ९५, धानोरा ९०, कापसी ८३.८०, कुंडलवाडी ८३.३०, माळेगाव ८२.५०, नरसी ८०, तळणी ७९, माजंरम ७८, अर्धापूर ७६.५०, दाभड ७६.५०, हदगाव ७६.३०, निवघा ७६.३०, मनाठा ७६.३०, पिपंरखेड ७६.३०, बारड ७५.५०, तामसा ७०.८०, कंधार ६९.५०, मुगट ६७.५०, आष्टी ६७, सिरजखेड ६७.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com