Rain Alert: वऱ्हाडात पावसाचा जोर ओसरला

गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात अवघा ७.२ मिलिमीटर पाऊस (Rainfall) झालेला आहे. केवळ तेल्हारा तालुक्यात पार्थर्डी मंडळात २४. ५ मिलिमीटर, हिवरखेड २०.५ मिलिमीटर पाऊस झाला.
Rainfall
RainfallAgrowon

अकोलाः दोन दिवसांपूर्वी सर्वत्र धुमाकूळ घालणाऱ्या पावसाचा जोर कमी झाला आहे. सर्वत्र पाऊस कमी झाला असून नदी-नाल्यांचे पाणीही ओसरले आहे. या आठवड्यातील पावसाने प्रकल्पांमधील पाणीसाठा (Water Storage) मात्र वाढण्यास मदत होत झाली आहे.

गेल्या २४ तासांत अकोला जिल्ह्यात अवघा ७.२ मिलिमीटर पाऊस (Rainfall) झालेला आहे. केवळ तेल्हारा तालुक्यात पार्थर्डी मंडळात २४. ५ मिलिमीटर, हिवरखेड २०.५ मिलिमीटर पाऊस झाला. लगतच्या बुलडाणा जिल्ह्यात अवघा ८.५ मिलिमीटर पावसाची नोंद झालेली आहे.

Rainfall
Rain Updates: नाशिक जिल्ह्याच्या पश्‍चिम पट्ट्यात दाणादाण

या जिल्ह्यात मोताळा तालुक्यात मोताळा मंडळात २९.५, बोराखेडी २४, धामणगाव २३.५, रोहिणखेड २९.५, पिंपळगाव देवी २३.५, बुलडाणा तालुक्यात बुलडाणा २८.५, देऊळघाट ३१, साखळी २८.५, चांधई २२.३ अशा मंडळात पावसाची नोंद झाली. वाशीम जिल्ह्यात अत्यंत हलक्या स्वरूपाच्या सरी गेल्या २४ तासांत झालेल्या आहेत.

Rainfall
Rain Updates: मराठवाड्यात ५२ मंडलांत अतिवृष्टी

जिल्ह्यात सरासरी ४.५ मिलिमीटर एवढीच नोंद झाली. या जिल्ह्यात एकही मंडळात १० मिलिमीटरएवढाही पाऊस झालेला नाही. शुक्रवारी सकाळपासून सर्वत्र वातावरण खुलले होते. कुठेही दुपारपर्यंत पाऊस (Rainfall) झालेला नव्हता.

Rainfall
Sugarcane: पावसामुळे आडसाली ऊस लागवड खोळंबली

या पावसामुळे अकोला (Akola) जिल्ह्यातील वाण या मोठ्या प्रकल्पात ४१.१६ दलघमी साठा झाला आहे. हा प्रकल्प ५०.२३ टक्के भरला आहे. गेल्या आठवडाभरात या प्रकल्पात वाढ झाली आहे. सातपुड्यात होत असलेल्या पावसामुळे धरणातील साठा (Water Storage) वाढत आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com