Rain Alert: पावसाचा जोर ओसरणार

गेले काही दिवसांपासून पूर्व किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र, सातत्याने दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा (Monsoon) आस, किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आदी पूरक प्रणालीमुळे राज्यात चांगला पाऊस झाला.
Rain Alert
Rain AlertAgrowon

पुणे : राज्यात दमदार कोसळणाऱ्या पावसाचा जोर ओसरला आहे. आज (ता. १७) कोकण, राज्यातील अनेक भागांत पावसाची उघडीप मिळण्याची शक्यता आहे. तर कोकणासह मध्य महाराष्ट्राचा घाटमाथा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. पूर्व मराठवाडा आणि विदर्भात विजांसह पावसाचा अंदाज हवामान विभागाने (IMD) वर्तविला आहे.

गेले काही दिवसांपासून पूर्व किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र, सातत्याने दक्षिणेकडे स्थिरावलेला मॉन्सूनचा (Monsoon) आस, किनाऱ्याला समांतर असलेला कमी दाबाचा पट्टा आदी पूरक प्रणालीमुळे राज्यात चांगला पाऊस झाला.

कोकण, घाटमाथ्यावर जोरदार कोसळणाऱ्या पावसाने सर्वदूर हजेरी लावली. गुजरातच्या किनाऱ्यावरील कमी दाबाचे क्षेत्र पश्‍चिमेकडे सरकणार आहे. मॉन्सूनचा आस उत्तरेकडे सरकण्याचे संकेत आहेत.

राज्यात पावसाचा जोर ओसरून उघडीप मिळण्याची शक्यता आहे. आज (ता. १७) कोकणातील रायगड, रत्नागिरी, मध्य महाराष्ट्रातील पुणे, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यांच्या घाटमाथा आणि विदर्भातील अकोला, गोंदिया, गडचिरोली जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) आहे. उर्वरित विदर्भासह, पूर्व मराठवाड्यात विजांसह पावसाची, तर राज्याच्या बहुतांशी भागात हलक्या पावसाची शक्यता आहे.

गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाब क्षेत्र

उत्तर ओडिशा आणि परिसरावर कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय असतानाच, अरबी समुद्रात गुजरातच्या किनाऱ्यावर तीव्र कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. गुजरातच्या पोरबंदरपासून ७० किलोमीटर पश्‍चिमेकडे तर ओखापासून १०० किलोमीटर दक्षिणेकडे असलेली ही प्रणाली पश्‍चिमेकडे सरकून ओमानकडे जाण्याचे संकेत आहेत. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा दोन्ही कमी दाब प्रणालींपासून बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. गुजरात आणि महाराष्ट्राच्या किनाऱ्याला समांतर हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे.

जोरदार पावसाचा इशारा (यलो अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा, कोल्हापूर, अकोला, गोंदिया, गडचिरोली.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

हिंगोली, नांदेड, लातूर, बुलडाणा, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com