Rain Alert: पावसाची बहुतांश भागात उघडीप

कोकणात (Kokan) शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काही भागांत जोरदार सरी बरसत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमी झालाय.
Heavy Rain
Heavy RainAgrowon

पुणेः राज्यात मागील काही दिवसांपासून बरसणारा पाऊस (Rain)आता कमी झाला. शुक्रवारी राज्यातील बहुतांश भागांत पावसाने उघडीप दिली होती. तर काही ठिकाणी संततधार सुरुच आहे. भारतीय हवामान विभागाने उद्या सकाळपर्यंत रायगड, पालघर, पुणे, सातारा, नाशिक, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांत जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला.

कोकणात (Kokan) शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला होता. मात्र काही भागांत जोरदार सरी बरसत आहेत. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड आणि पालघर जिल्ह्यांतही पावसाचा जोर कमी झालाय.

पावसाचा जोर ओसरल्यामुळे नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत घट झाली. कोल्हापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पावसामुळं शुक्रवारी दुपारपर्यंत ६४ बंधारे पाण्याखाली गेले. पाऊस कमी जास्त असल्याने नद्यांचे पाणी फार गतीने वाढत नाही.

Heavy Rain
Extremely Heavy Rain: निसर्गाचा घात

सांगली जिल्ह्यात गुरुवारी सायंकाळपासून पावसाचा जोर कमी झाला. शिराळा तालुक्यात मात्र संततधार पाऊस सुरूच आहे. पुणे जिल्ह्यातही बऱ्याच भागांत पावसाचा जोर कमी झाला. घाटमाथ्यावर मात्र पावसाची संततधार कायम आहे. नगर जिल्ह्यातील काही भागांत मुसळधार पाऊस झाला. धरणक्षेत्रात झालेल्या पावसाने पाणीपातळीत वाढ झाली. मात्र बऱ्याच भागांत पावसाने उघडीप दिली.

सोलापूर जिल्ह्यात शुक्रवारी पावसाने काहीशी विश्रांती घेतली. पण जिल्ह्याच्या अनेक भागांत दिवसभर कधी ऊन, कधी ढगाळ असे वातावरण राहिले. खानदेशात गुरुवारी दुपारनंतर पाऊस थांबला. शुक्रवारी काही भागांत पाऊस झाला. मात्र बहुतांश ठिकाणी पाऊस नव्हता.

Heavy Rain
Rain Updates: मराठवाड्यात ५२ मंडलांत अतिवृष्टी

विदर्भाच्या काही जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी पावसाने उघडीप दिली. मात्र पूर्व विदर्भातील भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये पावसाची रिपरिप सुरूच होती. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील १८ मार्गांवरील वाहतूक दुसऱ्या दिवशीदेखील सुरळीत होऊ शकली नाही.

गडचिरोली हा पावसामुळे सर्वाधिक प्रभावित जिल्हा ठरला. गडचिरोलीतील २,७८५ कुटुंबांचे स्थलांतर करण्यात आले. बुलडाणा, अकोला आणि वाशीम जिल्ह्यांत दोन दिवसांपूर्वी पावसाने सर्वत्र धुमाकूळ घातला. मात्र शुक्रवारी पावसाचा जोर कमी झाला. त्यामुळे नदी-नाल्यांचे पाणीही ओसरले.

मराठवाड्यातही बहुतांश ठिकाणी पावसाने अघडीप दिली. औरंगाबाद, उस्मानाबाद, लातूर, बीड या जिल्ह्यांत काही ठिकाणी मध्यम पाऊस झाला. मात्र तुरळक ठिकाणी जोरदार सरी बरसल्या. परभणी जिल्ह्यातील ४६ मंडळांत हलका पाऊस झाला. तर हिंगोली जिल्ह्यातील ३० मंडळांत हलका ते मध्यम पावसाने हजेरी लावली. शुक्रवारी पाऊस कमी झाला. मात्र अनेक भागांत आंतरमशागतीसाठी वाफसा नाही. तर काही ठिकाणी पावसाची रिमझिम सुरुच आहे. त्यामुळे आंतरमशागतीच्या कामांनी अद्यापही जोर धरला नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com