Monsoon Update : ईशान्य मॉन्सूनला सुरुवात

मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून या भागातून जवळपास २३ टक्के मॉन्सून परतला आहे. या भागात हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल इतके वाढले आहेत.
Monsoon Season
Monsoon SeasonAgrowon

राजस्थान, चंदिगढ, जम्मू आणि हरियाणाया भागात पाऊस (Rainfall) थांबला आहे.(Rain Stopped) मॉन्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाला असून या भागातून जवळपास २३ टक्के मॉन्सून परतला आहे. या भागात हवेचे दाब (Wind Pressure) १००४ हेप्टापास्कल इतके वाढले आहेत. त्याखालोखाल गुजरातच्या (Gujarat Winds) उत्तरेकडील भागावरील हवेचे दाब १००६ हेप्टापास्कल इतके अधिक आहेत.

Monsoon Season
Weather Update : कोकण, मध्य महाराष्ट्रात पावसाची शक्यता

सिक्कीम भागावर हवेचे दाब १००४ हेप्टापास्कल, तर मध्य प्रदेशच्या भागावर १००८ हेप्टापास्कल इतके वाढले आहे. वाऱ्याच्या दिशेतही बदल झालेला आहे. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने वायव्येकडून ईशान्येकडे व दक्षिणेकडे आहे. वारे ईशान्येकडून पूर्वेकडे वाहताना मोठ्या प्रमाणावर ढग वाहून आणतील. त्यामुळे उत्तर महाराष्ट्र व पश्‍चिम महाराष्ट्रात पावसाचे प्रमाण वाढेल.

Monsoon Season
Tur Crop Management : तुर पिकाच्या चांगल्या वाढीसाठी कोणते उपाय कराल?| Agrowon | ॲग्रोवन

जेथे हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल तेथे अचानक ढग जमा होऊन थोड्या कालावधीत अधिक पावसाची शक्यता आहे. ऑक्टोबर महिन्यामध्ये सरासरीपेक्षा पावसाचे प्रमाण अधिक राहण्याची शक्यता आहे.

Monsoon Season
Crop Damage : नुकसानग्रस्तांना पीकविम्याचा लाभ द्या,

बंगालच्या उपसागरावर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. बंगालच्या उपसागराच्या उत्तरेकडील भागावर हवेचा दाब १००० हेप्टापास्कल इतका कमी राहण्यामुळे त्याजवळील भागात पावसाचे प्रमाण वाढेल.

Monsoon Season
Crop Damage : अतिवृष्टिने पिकांचे मोठे नुकसान तरीही नजर अंदाज पैसेवारी ५८ पैसे

ही स्थिती गुरुवार (ता. ६) पर्यंत कायम राहील. हवामान ढगाळ राहील. नगर, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, नंदूरबार, ठाणे व रायगड जिल्ह्यांत जोरदार पावसाची शक्यता आहे. मात्र विदर्भात पावसात उघडीप राहण्याची शक्यता आहे.

Monsoon Season
Sharad Pawar : ...हे शहाणपणाचे लक्षण नाही

कोकण ः

आज (ता. ३) रायगड व ठाणे जिल्ह्यांत ५० ते ८० मि.मी., तर रत्नागिरी व पालघर जिल्ह्यांत ३२ ते ६० मि.मी. पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १० ते २० मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा आग्नेयेकडून आणि ताशी वेग ३ ते ४ कि.मी. राहील. रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत कमाल तापमान ३० अंश सेल्सिअस,

तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस, तर सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९३ ते ९४ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ८० टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

आज (ता.३) नाशिक व नंदूरबार जिल्ह्यांत ३० ते ४० मि.मी., तर धुळे जिल्ह्यात २५ ते २७ मि.मी. व जळगाव जिल्ह्यात ३ ते १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून, तर जळगाव जिल्ह्यात वायव्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ९ ते १५ कि.मी. राहील. कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ९२ टक्के, तर दुपारची ४६ ते ६८ टक्के राहील.

मराठवाडा ः

परभणी, हिंगोली, नांदेड, जालना व औरंगाबाद जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्य आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात ३ मि.मी., लातूर जिल्ह्यात १० मि.मी., जालना जिल्ह्यात १२ मि.मी. व बीड जिल्ह्यात १६ मि.मी. पावसाची शक्यता आहे. आज (ता. ३) लातूर, नांदेड, परभणी व हिंगोली जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्य आहे.

जालना व उस्मानाबाद जिल्ह्यांत उद्या ३ ते ४ मि.मी., तर बीड व औरंगाबाद जिल्ह्यांत १७ ते २३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. लातूर, नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत पावसात उघडीप राहणे शक्य आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ८ ते १४ कि.मी. राहील. कमाल तापमान औरंगाबाद व उस्मानाबाद जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस,

तर लातूर, बीड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस राहील. नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत कमाल तापमान ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २३ ते २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ५० टक्के राहील.

पश्‍चिम विदर्भ ः

आज सर्वच जिल्ह्यांत पावसात उघडीप राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ९ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७५ ते ८२ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४३ ते ४६ टक्के राहील.

मध्य विदर्भ ः

यवतमाळ, वर्धा, नागपूर जिल्ह्यात आज (ता. ३) पावसात उघडीप राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ७ ते १० कि.मी. राहील. कमाल तापमान ३५ ते ३६ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७० ते ७६ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ४८ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

चंद्रपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यांत आज (ता.३) पावसात उघडीप राहणे शक्य आहे. गडचिरोली जिल्ह्यात आज (ता. ३) पावसात उघडीप राहील. वाऱ्याची दिशा वायव्येकडून आणि ताशी वेग ४ ते ६ कि.मी. राहील. कमाल तापमान भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस,

तर चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यांत ३६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २४ ते २५ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ७६ ते ८१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ४५ ते ५० टक्के राहील.

पश्‍चिम महाराष्ट्र ः

आज (ता.३) पुणे व नगर जिल्ह्यांत ६० ते ८० मि.मी. पावसाची शक्यता आहे. सातारा जिल्ह्यात आज ६० मि.मी. पावसाची शक्यता आहे. सांगली व कोल्हापूर जिल्ह्यात आज आज ४० ते ६० मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात आज आज २७ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा वायव्येकडून राहील.

वाऱ्याचा ताशी वेग ५ ते १२ कि.मी. राहील. कमाल तापमान नगर जिल्ह्यात ३५ अंश सेल्सिअस, सोलापूर व पुणे जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, सातारा व सांगली जिल्ह्यांत ३२ ते ३३ अंश सेल्सिअस आणि कोल्हापूर जिल्ह्यात ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९५ टक्के, तर दुपारची ५५ ते ७२ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

- योग्य ओलीवर सुधारित पद्धतीने हरभरा पिकाची पेरणी करावी.

- करडई पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यापर्यंत पूर्ण करावी.

- जनावरांचे गोचिडांपासून संरक्षण करण्याकरिता गोठ्याची स्वच्छता राखावी.

- कुक्कुटपक्ष्यांना रोगप्रतिबंधात्मक लसीकरण करून घ्यावे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com