Monsoon Update : मॉन्सूनचे पुनरागमन

अपेक्षित पावसामुळे सोयाबीन, मूग, उडीद मटकी, चवळी, तूर, भुईमूग या द्विदलवर्गीय पिकांच्या पेरण्या पूर्ण करता येतील. हा पाऊस फळबागांच्या लागवडीसाठी तसेच उभ्या फळबागांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल.
Monsoon Update
Monsoon UpdateAgrowon

या आठवड्यात महाराष्ट्रावर १००० ते १००२ हेप्टापास्कल इतका कमी हवेचा दाब राहण्याची शक्यता असून, हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होईल. त्यामुळे मॉन्सून वाऱ्यांना (Monsoon Wind) योग्य गती व दिशा मिळेल. या आठवड्यात कोकणात अतिवृष्टी (Heavy Rain In Konkan) तर उर्वरित महाराष्ट्रात समाधानकारक पाऊस (Rain Forecast) होणे शक्य आहे.

अपेक्षित पावसामुळे सोयाबीन (Soybean), मूग (Green Gram), उडीद मटकी, चवळी, तूर, भुईमूग (Groundnut) या द्विदलवर्गीय पिकांच्या पेरण्या (Sowing) पूर्ण करता येतील. हा पाऊस फळबागांच्या लागवडीसाठी तसेच उभ्या फळबागांच्या वाढीसाठी उपयुक्त ठरेल. कोकणात भात लावणीसाठी चिखलणीची कामे पूर्ण करून भात रोपांची लावणी पूर्ण करावी. दुष्काळी पट्ट्यात पेरणीयोग्य पाऊस होताच पिकांच्या पेरण्या करून घ्याव्यात.

कोकण ः

ठाणे व पालघर जिल्ह्यात आज ७६ मिमी, तर उद्या ६० मिमी पावसाची शक्यता आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, व रायगड जिल्ह्यांत आज ५४ ते ६० मिमी आणि उद्या ५५ ते ६४ मिमी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग १८ कि.मी., तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २२ ते २८ किमी राहील. कमाल तापमान सिंधुदुर्ग, रत्नागिरी व रायगड जिल्ह्यांत २९ अंश सेल्सिअस तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३० अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यांत २४ अंश सेल्सिअस तर रायगड, ठाणे व पालघर जिल्ह्यांत २५ ते २६ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ९० ते ९२ टक्के तर दुपारची ८४ ते ८८ टक्के राहील.

उत्तर महाराष्ट्र ः

नाशिक व धुळे जिल्ह्यांत आज ७५ मिमी, तर उद्या २० ते ४५ मिमी पावसाची शक्यता आहे. आज नंदूरबार जिल्ह्यात ५२ मिमी, तर जळगाव जिल्ह्यात ३२ मिमी पावसाची शक्यता असून, उद्या १२ ते १७ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग १४ ते २३ किमी राहील. कमाल तापमान नाशिक, धुळे, नंदूरबार जिल्ह्यांत २८ अंश सेल्सिअस व जळगाव जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. सर्व जिल्ह्यांत किमान तापमान २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८३ ते ९२ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६७ ते ८५ टक्के राहील.

Monsoon Update
Fertilizer : रासायनिक कंपन्यांनी सेंद्रिय खते पुरवावीत

मराठवाडा ः

उस्मानाबाद, लातूर, व जालना जिल्ह्यांत आज ६ ते ८ मिमी, तर उद्या ६ ते १३ मिमी पावसाची शक्यता आहे. नांदेड, बीड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत आज १६ ते २४ तर उद्या १३ ते १६ मिमी पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यात वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग उस्मानाबाद, लातूर, बीड जिल्ह्यांत २४ किमी राहील. नांदेड, परभणी, हिंगोली, औरंगाबाद व जालना जिल्ह्यांत वाऱ्याचा ताशी वेग १८ ते १९ किमी राहील. कमाल तापमान औरंगाबाद, बीड, लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यांत २९ ते ३० अंश सेल्सिअस, तर नांदेड जिल्ह्यात २७ अंश सेल्सिअस, परभणी व जालना जिल्ह्यांत २६ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सर्वच जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८४ ते ८६ टक्के, तर दुपारची ७४ ते ८० टक्के राहील. पावसाचे प्रमाण सर्वच जिल्ह्यांत मध्यम राहील.

Monsoon Update
Soybean : सोयाबीनच्या आगारात खरिपाच्या ३० टक्के पेरण्या बाकी

पश्‍चिम विदर्भ ः

कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत २५ ते २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २१ ते २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८१ ते ८५ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६४ ते ७० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १९ किमी राहील. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. या सर्वच जिल्ह्यांत आज २६ ते ३० मिमी. पावसाची शक्यता आहे. उद्या अकोला व अमरावती जिल्ह्यांत ३७ ते ४० मिमी. तर वाशीम, बुलडाणा जिल्ह्यांत १५ ते २५ मि.मी.

पावसाची शक्यता आहे.

मध्य विदर्भ ः

आज यवतमाळ, वर्धा जिल्ह्यात १४ ते १५ मिमी व नागपूर जिल्ह्यात २७ मिमी. पावसाची शक्यता आहे. या सर्वच जिल्ह्यात उद्या ६ ते १३ मिमी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. वाऱ्याचा ताशी वेग १३ ते १७ किमी राहील. कमाल तापमान सर्वच जिल्ह्यात २६ ते २८ अंश सेल्सिअस तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८२ ते ८३ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ६८ ते ७३ टक्के राहील.

पूर्व विदर्भ ः

चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत आज १४ ते १९ मिमी. तर उद्या ७ ते १३ मिमी पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून आणि ताशी वेग ७ ते १२ कि.मी. राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २७ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८५ ते ९१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ७३ ते ७५ टक्के राहील.

दक्षिण पश्‍चिम महाराष्ट्र ः

कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यांत आज ४१ ते ४५ मि.मी. पावसाची शक्यता आहे. सोलापूर जिल्ह्यात आज आणि उद्या ८ मि.मी. पावसाची शक्यता असून पुणे जिल्ह्यात आज ५० मि.मी. आणि उद्या ३४ मि.मी. पावसाची शक्यता आहे. नगर जिल्ह्यात आज ३८ मि.मी. व उद्या २३ मि.मी. पावसाची शक्यता आहे. वाऱ्याची दिशा नैर्ऋत्येकडून राहील. सर्वच जिल्ह्यांत कमाल तापमान २८ ते २९ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान २२ ते २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश अंशतः ढगाळ राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ८७ ते ९० टक्के राहील. दुपारची सापेक्ष आर्द्रता सांगली व सोलापूर जिल्ह्यात ७१ ते ७७ टक्के, तर उर्वरित जिल्ह्यात ८१ ते ८५ टक्के राहील.

कृषी सल्ला ः

१) भात लावणीसाठी चिखलणीची कामे करून २६ ते २८ दिवसांची भात रोपे लावावीत.

२) चांगला पाऊस झालेल्या ठिकाणी सोयाबीन पिकाची रुंद वरंबा सरी पद्धतीने पेरणी करावी.

३) दुष्काळी पट्ट्यात पाऊस चांगला झालेल्या ठिकाणी बाजरी अधिक तूर (२ः१) या आंतरपीक पद्धतीचा अवलंब करावा.

४) जमिनीत चांगली ओल झाल्यानंतर मूग, मटकी, उडीद, चवळी, तूर या पिकांच्या पेरण्या कराव्यात.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com