Food security: अन्नसुरक्षेसाठी भारतीय शेतकऱ्यांची भूमिका महत्त्वाची

भारतातील शेतकऱ्यांच्या मदतीने G-7 देशांची अन्नसुरक्षितता सुनिश्चित केली जाऊ शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
Narendra Modi
Narendra ModiAgrowon

भारतातील शेतकऱ्यांच्या मदतीने G-7 देशांची अन्नसुरक्षितता (Food Security) सुनिश्चित केली जाऊ शकते, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी केले. जर्मनीत पार पडलेल्या G-7 शिखर परिषदेत त्यांनी हजेरी लावली. परिषद सुरू होण्यापूर्वी मोदींनी अनेक जागतिक नेत्यांच्या भेटी घेतल्या आणि त्यानंतर शिखर परिषदेच्या पहिल्या सत्राला संबोधित केले. आपल्या भाषणादरम्यान मोदींनी जागतिक अन्नसुरक्षा तसेच रशिया युक्रेन युद्धामुळे जगावर झालेल्या विपरीत परिणामांकडे लक्ष वेधलं. (Narendra Modi's Speech in G-7 Conference)

अन्नसुरक्षेवरील आयोजित सत्रात पंतप्रधान मोदी म्हणाले की, "भारतीय शेतकऱ्यांकडे असलेल्या पारंपारिक प्रतिभेच्या मदतीने, G7 देशांची अन्नसुरक्षा सुनिश्चित केली जाऊ शकते. भारताच्या शेती कौशल्याचा वापर करण्यासाठी G7 राष्ट्रांनी एक संरचित प्रणाली विकसित करावी. G7 देशांच्या तुलनेत भारताकडे प्रचंड कृषी मनुष्यबळ असून भारतीय शेतकऱ्यांच्या कृषी कौशल्यामुळे G7 देशांमध्ये चीज आणि ऑलिव्हसारख्या पारंपारिक कृषी उत्पादनांना नवसंजीवनी मिळेल."

Narendra Modi
अन्नसुरक्षा ‘डब्लूटीओ’च्या कक्षेबाहेरच

युक्रेन-रशिया युद्ध दीर्घकाळ सुरु राहिल्यास त्याचा परिणाम संपूर्ण जगावर होणार असून. जागतिक अन्न सुरक्षितता धोक्यात येणार, असा अहवाल आयएमएफने मार्च महिन्यात दिला होता. या अहवालात युक्रेन-रशिया युद्धामुळे आफ्रिकेतल्या अनेक देशांवर उपासमारीची वेळ येण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. काळ्या समुद्रातून होणारी वाहतुक विस्कळीत झाल्याने इजिप्तसारख्या देशांवर थेट परिणाम झाला आहे. दुसरीकडे आयात करणार्‍या देशांची यादी मोठी आहे. अफगाणिस्तान, इथिओपिया, सीरिया, येमेनसारख्या देशांना मोठा फटका बसणार असून तिथेही नागरिकांची उपासमार होण्याची भीती व्यक्त करण्यात आली होती.

या पार्श्वभूमीवर भारताने गेल्या काही महिन्यांत अनेक देशांना अन्नधान्याचा पुरवठा केला आहे. भारताने अफगाणिस्तानलाही मानवतावादी दृष्टिकोनातून सुमारे ३५ हजार टन गव्हाचा पुरवठा केला आहे. मागच्या आठवड्यात अफगाणिस्तानात झालेल्या भूकंपानंतर भारताने सर्वप्रथम मदत पोहोचवली होती. तसेच श्रीलंकेत ओढवलेल्या संकटानंतर भारताने त्यांना मदत देऊ केली, असा उल्लेख पंतप्रधानांनी आपल्या भाषणात केला.

भारतात सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन दिले जात असल्याचे मोदी यांनी यावेळी आवर्जून सांगितले. G7 राष्ट्रांतील तज्ज्ञ मंडळींनी यावर अभ्यास करावा, असे आवाहन त्यांनी केले.

Narendra Modi
निर्यातबंदीनंतरही गहू निर्यात विक्रमी स्वरूपात

खत पुरवठ्यात अडचणी

पंतप्रधानांनी यावेळी खत पुरवठ्यातील अडचणींचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, "आम्ही भारतात खतांचे उत्पादन वाढविण्याचा प्रयत्न करत आहोत. यासाठी आम्हाला G7-देशांच्या सहकार्याची गरज आहे." रशिया- युक्रेन युद्धामुळे विस्कळीत झालेला खतांचा पुरवठा सुरळीत करण्यासाठी G-7 राष्ट्रांनी मदत करावी, असे आवाहन त्यांनी केले. रशिया-युक्रेन युद्धामुळे खतांच्या किमतीही भडकल्या. त्यामुळे शेतकरी शेतकरी संकटात सापडले. तसेच यंदा विविध प्रकारच्या खतांचा साठा देखील अपुरा आहे.

अन्नसुरक्षेसाठी भरडधान्यांची भूमिका मोलाची

जगाची अन्नसुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी भरडधान्य मोलाची भूमिका बजावू शकतात, असे मोदी यानी यावेळी सांगितले. "पुढच्या वर्षी आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष साजरे करण्यात येणार आहे. यानिमित्ताने आपण भरडधान्यांसारख्या पौष्टिक पर्यायाला चालना देण्यासाठी मोहीम राबवली पाहिजे," मोदी म्हणाले.

रशिया युक्रेन युद्धावर मोदी म्हणाले, युद्ध संपवण्यासाठी चर्चा हाच एकमेव मार्ग आहे. जगात तणावाचं वातावरण असतानाही शिखर परिषद होत आहे. दोन देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाचा परिणाम उर्वरित जगावर सुद्धा होतोय. त्यामुळे दोन्ही देशांनी चर्चेने आपला संघर्ष मिटवण्याचे आवाहन मोदींनी यावेळी केले.

मोदी पुढे म्हणाले, "भारत नेहमीच शांततेच्या बाजूने राहिलाय. सध्याच्या परिस्थितीतही आम्ही संवाद आणि मुत्सद्देगिरीचा मार्ग स्वीकारण्याचा सातत्याने आग्रह धरला आहे. या भू-राजकीय तणावाचा परिणाम केवळ युरोपपुरता मर्यादित नाही. ऊर्जा आणि अन्नधान्याच्या किंमतींवरही याचा परिणाम होतोय. युद्धामुळे विकसनशील देशांची ऊर्जा आणि सुरक्षा धोक्यात आली आहे."

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com