Agriculture Technology : शेतकऱ्यांच्या प्रगतीचा वेध घेणारी बारामती पाहिल्याचे समाधान

देशात कृषी क्षेत्राशी निगडित लक्षवेधी काम करणारी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीमध्ये कार्यरत आहे. अत्याधुनिक शेतीतंत्रज्ञान आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागण्यासाठी येथील प्रशासनाने दिलेले योगदान शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.
Sharad Pawar
Sharad PawarAgrowon

माळेगाव, ता. बारामती ः देशात कृषी क्षेत्राशी (Agriculture Sector) निगडित लक्षवेधी काम करणारी राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था बारामतीमध्ये कार्यरत आहे. अत्याधुनिक शेतीतंत्रज्ञान (Modern Agriculture Technology) आणि विद्यार्थ्यांमध्ये संशोधक वृत्ती वाढीस लागण्यासाठी येथील प्रशासनाने दिलेले योगदान शेती आणि शेतीपूरक व्यवसायाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरते.

Sharad Pawar
Krushik Exhibition 2023 : ऑक्सफर्ड’ची ज्ञानगंगा मऱ्हाटी अंगणी

याकामी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या प्रगतीचा वेध घेणारी बारामती पाहिल्याचे समाधान वाटते. या प्रक्रियेला अधिकचे प्रोत्साहन देण्यासाठी मायक्रोसॉफ्ट कंपनी मदतीस अनुकूलता दाखवेल, असे प्रतिपादन मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा यांनी केले.

माळेगाव खुर्द (ता. बारामती) येथील राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेमध्ये मायक्रोसॉफ्टचे कार्यकारी संचालक डॉ. रणवीर चंद्रा, ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर, राहुरीच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे डॉ. प्रशांतकुमार पाटील, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, राजेंद्र पवार आदी पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देत विविध अत्याधुनिक शेतीतंत्राची माहिती घेतली. त्या वेळी उपस्थित शास्त्रज्ञांसह विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना डॉ. चंद्रा बोलत होते.

Sharad Pawar
Krushik Exhibition : बारामतीत सुरू होतेय नवीन ‘कृषिपर्व’

दरम्यान, राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्थेचे संचालक डॉ. के. सॅमी रेड्डी म्हणाले, की देशात तूर, मूग व सोयाबीनचे अजैविक ताण सहन करण्याचे वाण निर्माण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी फिनोमिक्स तंत्रज्ञानाचा (वनस्पतींच्या वाढीचा अभ्यास करणारे तंत्रज्ञान) वापर करण्यात आला आहे.

अर्थात, अशा प्रकारच्या सुविधा भारतामध्ये केवळ चार ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामध्ये राष्ट्रीय अजैविक ताण व्यवस्थापन संस्था-बारामतीचा समावेश आहे. याकामी कृषिप्रेमी शरद पवार यांचे योगदान विसरता कामा नये.

या वेळी शास्त्रज्ञ डॉ. जगदीश राणे यांनी संस्थेमधील विविध संशोधनात्मक माहिती विस्तृतपणे उपस्थितांना दिली. दरम्यान, बारामतीतील अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून डच तंत्रज्ञानावर आधारित सेंटर फॉर एक्सलन्स फॉर डेअरीची पाहणी डॉ. रणवीर चंद्रा आदींनी केली.

या वेळी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट ही संस्था बारामती परिसरातील मागील वीस वर्षांतील शेतीसंदर्भात हवामान, माती, पाणी आदींबाबतचा डेटा मायक्रोसॉफ्ट आणि ऑक्सफर्डला उपलब्ध करून देईल. त्यातून कृत्रिम बुद्धिमत्तेवर, उपग्रहावर आधारित तंत्रज्ञानाद्वारे भविष्यातील अत्याधुनिक शेतीचे नियोजन करण्यात येईल. या तंत्रज्ञानाचा थेट शेतकऱ्यांना उपयोग होण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी माहिती शरद पवार यांनी बोलून दाखविली.

कृत्रिम बुद्धिमत्तेने बदलेल शेतीचे समीकरण!

भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर शेती व पशुपालनाच्या सक्षमीकरणासाठी केला जावू शकतो. ते तंत्रज्ञान विकसित करण्यासाठी बारामती येथील सुविधा उपयुक्त ठरतील. त्यामुळेच मायक्रोसॉफ्ट व ऑक्सफर्ड विद्यापीठ हे अॅग्रीकल्चरल डेव्हलमेंट ट्रस्टला मदतीचा हात पुढे करीत आहे, असा विश्वास ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कृत्रिम बुद्धिमत्ता विभागाचे संचालक डॉ. अजित जावकर यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com