Nagar Festival
Nagar FestivalAgrowon

Nagar Festival : नगर महोत्सवाचा दुसरा दिवसही ठरला गर्दीचा

नगर येथे कृषी विभाग, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ‘नगर महोत्सव’ला दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ११) देखील भरभरून प्रतिसाद मिळाला.

नगर ः नगर येथे कृषी विभाग (Agriculture Department), जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा व पशुसंवर्धन विभाग (Department Of Animal Husbandry) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू झालेल्या ‘नगर महोत्सव’ला (Nagar Festival) दुसऱ्या दिवशी शनिवारी (ता. ११) देखील भरभरून प्रतिसाद मिळाला. शहरासह जिल्हाभरातून नागरिकांची खरेदीसाठी गर्दी दिसून आली. अजून चार दिवस हा महोत्सव सुरू राहणार आहे.

शेतकऱ्यांच्या शेतीमालाची थेट ग्राहकांना विक्री करता यावी यासाठी शासनाकडून धान्य व फळे महोत्सव घेतला जात होता. खरे तर तत्कालीन कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने व तत्कालीन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विकास पाटील यांच्या प्रयत्नांतून राज्यात पहिल्यांदा धान्य व फळे महोत्सवाची नगरला सुरुवात झाली.

नंतर राज्यभर हा उपक्रम राबवला जाऊ लागला. महिला बचत गटाची चळवळ अधिक जोमात सुरू झाल्याने बचत गटांनी उत्पादित केलेल्या साहित्याचे प्रदर्शन व विक्रीसाठी साई ज्योती स्वयंसाह्यता यात्रा भरवली जाते. तीन वर्षांपासून कोरोनामुळे दोन्ही उपक्रम झाले नाही.

Nagar Festival
Nagar City News : नगर जिल्ह्याचे विभाजन झाले पाहिजे ः राम शिंदे

यंदा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले व जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या पुढाकाराने फळे व धान्य महोत्सव, साईज्योती स्वंयसाह्यता यात्रा व पशुप्रदर्शन हा एकत्रित कार्यक्रम होत आहे.

Nagar Festival
Nagar Festival : धान्य, बचत गटांसाठी महोत्सव

पहिल्याच दिवशी येथे नागरिकांची खरेदीसाठी गर्दी पाहायला मिळाली. नगर शहरातील व जिल्ह्यातील अनेक नागरिक, महिला खरेदीसाठी आले. येथील खाद्य पदार्थांचाही अनेकांनी आनंद घेतली. शेतकरी पशुप्रदर्शनाचा लाभ घेत आहेत.

शेतकऱ्यांनी, महिला बचत गटांनी उत्पादित केलेल्या मालाची थेट खरेदी करण्याची संधी आल्याने धान्य, फळे व अन्य साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याचे पाहायला मिळाले.

महिला, शाळकरी मुलांची गर्दी

नगर येथील न्यू आर्ट महाविद्यालयाच्या प्रांगणावर सुरू असलेल्या नगर महोत्सवाला शहरासह जिल्हाभरातील महिला, शाळकरी मुलांसह शेतकऱ्यांची पाहणी व खरेदीसाठी गर्दी होत आहे. महिला, मुलांचे जत्थे दिवसभर येत होते.

तृणधान्यावर शनिवारी (ता. ११) प्रसिद्ध व्याख्यात्या नीलिमा जोरवर यांचे व्याख्यान झाले. कृषी संचालक विकास पाटील यांनी पाहणी केली.

जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, शिवाजी जगताप, कृषी उपसंचालक रवींद्र माने, उपविभागीय अधिकारी गहिनीनाथ कापसे, कृषी विकास अधिकारी शंकर किरवे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com