शिंदे गट उद्या आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांना पाठवणार

आपल्याकडे ४१ आमदारांचे संख्याबळ असल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले. शिवसेनेचे ४१ आणि ६ अपक्ष अशा सर्व ४७ स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांकडे पाठवले जाणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले.
Uddhav Thackeray
Uddhav ThackerayAgrowon

वृत्तसंस्था

मुंबई: शिवसेनेचे ज्येष्ठ नेते व राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आपल्या समर्थक आमदारांच्या स्वाक्षऱ्यांचे पत्र उद्या (शुक्रवारी) राज्यपालांकडे पाठवणार असल्याचे वृत्त आहे. आपल्याकडे ४१ आमदारांचे संख्याबळ असल्याचा दावा शिंदे यांनी केला. शिवसेनेचे (Shivsena) ४१ आणि ६ अपक्ष असे एकूण ४७ आमदार आमच्यासोबत असल्याचे शिंदे यांचे म्हणणे आहे.

सदस्यसंख्येच्या जोरावर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी पक्ष आणि पक्षचिन्हावर दावा केला आहे. त्यासाठी ते कायदेशीर प्रक्रिया करायलाही तयार असल्याचे सांगण्यात आले. शिवसेनेचे सर्वाधिक सदस्य पाठीशी असल्यामुळे आपला गट हीच खरी शिवसेना असून शिवसेनेचे पक्षचिन्ह धनुष्यबाण वापरण्याचा हक्क आपल्या गटाला मिळावा, यासाठी शिंदे गटाकडून प्रयत्न केला जात आहे. शिंदे यांच्या या पवित्र्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाविकास आघाडीचे भवितव्य धोक्यात आले आहे.

Uddhav Thackeray
महाविकास आघाडीतून बाहेर पडू पण मुंबईत या: राऊतांची शिंदेंना साद

दरम्यान शिवसेनेचे प्रवक्ते व खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शिंदे गटाला भावनिक साद घालत मुंबईत परतण्याचे आव्हान केले होते. त्यावर चर्चेची वेळ निघून गेल्याचे सांगत शिंदे यांनी सरकार पाडण्याचा आपला इरादा उघड केला आहे. त्यानंतरही राऊत ट्विटरच्या माध्यमातून शिंदे गटाला आव्हान करत आहेत.

Uddhav Thackeray
चर्चेची वेळ निघून गेली: सरकार पडल्यावरच शिंदे परतणार

आपल्याकडे ४१ आमदारांचे संख्याबळ असल्याचे शिंदे गटाने स्पष्ट केले. शिवसेनेचे ४१ आणि ६ अपक्ष अशा सर्व ४७ स्वाक्षऱ्यांचे पत्र राज्यपालांकडे पाठवले जाणार असल्याचे शिंदे गटाकडून सांगण्यात आले. आज आणखी काही आमदार येणार असल्याने त्यांच्या स्वाक्षऱ्या घेतल्या जाणार असल्याचेही नमूद करण्यात आले.

दरम्यान शिंदे गटाची मनधरणी करण्यासाठी गुवाहातीस रवाना झालेले रविंद्र फाटकही (Ravindra Fatak)आता शिंदे गटाला सामील झाले आहेत. फाटक हे दोन दिवसांपूर्वी एकनाथ शिंदे यांच्या गटाला समजावण्यासाठी गेले होते. तेच फाटक आता शिंदे गटात सहभागी झाले.

रविंद्र फाटक हे उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे निकटवर्तीय समजले जातात.फाटक हे शिवसेनेचे विधान परिषदेतील ठाण्यातील आमदार आहेत. त्यांचे आणि शिंदे यांचे आधीपासूनच सख्य आहे. सत्ता स्थापनेसाठी विधानसभेतील आमदार महत्वाचे ठरतात. पण या निमित्ताने विधान परिषदेतील आमदारही शिंदे यांच्या गळाला लागला आहे, असे सांगण्यात येत आहे. या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनीही आपल्या आमदारांना संघर्षासाठी तयार रहा, अशा सूचक शब्दांत सावध केले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com