Lumpy skin disease : शिंगोर्णीतील सहा जनावरे ‘लम्पी स्कीन’ रोगमुक्त

बचेरी, काळमवाडीत लसीकरण सुरू; प्रादुर्भाव आटोक्यात
Lumpy Disease
Lumpy DiseaseAgrowon

लम्पी स्कीन’ (Lumpy skin) आजाराने बाधित झालेल्या जिल्ह्यातील शिंगोर्णी (ता. माळशिरस) येथील दहा जनावरांपैकी सहा जनावरे पूर्णपणे बरी झाली असून, अन्य जनावरांना स्वतंत्र व्यवस्थेत ठेवण्यात आले आहे. तसेच त्यांच्यावर उपचारही ( Treatment) सुरू आहेत. दरम्यान, पशुसंवर्धन (Animal husbandry) विभागाने या भागातील शिंगोर्णीसह बचेरी, काळमवाडी गावात वेगाने लसीकरणाला सुरुवात केली आहे. त्यामुळे सध्या तरी ‘लम्पी स्कीन’चा प्रादुर्भाव आटोक्यात आहे.

गेल्या आठवड्यात लम्पीचा प्रादुर्भाव आढळल्यानंतर या भागातील दहाही जनावरांना वेगळे ठेवण्यात आले आहे. त्यापैकी एक म्हैस आणि पाच गाई आता पूर्णपणे बऱ्या झाल्याचे सांगण्यात आले. पण अन्य सहा जनावरांवर उपचार सुरू आहेत. तसेच बाधित जनावरांच्या परिसरापासून पाच किलोमीटरपर्यंत अन्य जनावरे लांब राहतील, याची काळजी घेण्यात आली आहे. तसेच याच परिसरातील बचेरी, काळमवाडी परिसरातील जनावरांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. या भागात सर्व्हेक्षण करून या भागातील ६ हजार ५०० जनावरांच्या लसीकरणाचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यापैकी आतापर्यंत ४ हजार ३२० जनावरांचे लसीकरणही पूर्ण झाले आहे. त्यानुसार शिंगोर्णीतील १ हजार ४४५, बचेरीतील १ हजार १७६, काळमवाडीतील १ हजार ६९९ अशा एकूण ४ हजार ३२० पशुधनांचे लसीकरण करण्यात आले आहे.

Lumpy Disease
Lumpy Skin : परराज्यातील जनावरांच्या वाहतुकीला प्रतिबंध

जिल्ह्याच्या वाट्याला १२ हजार लसी

जिल्ह्यात गाई आणि म्हैस वर्गातील साधारण १२ लाख ५८ हजार ८९८ इतकी जनावरे आहेत. सध्या माळशिरस शिंर्गोर्णी गावातच दहा जनावरे या रोगाने बाधित झाली आहेत. या भागात लसीकरणही सुरू आहे. सध्या जिल्ह्यासाठी लम्पीवर उपयुक्त ठरणारे लसीचे केवळ १२ हजार १८० लस उपलब्ध आहेत. पण एकूण जनावरांची संख्या पाहता, ही उपलब्धता अगदीच तोकडी आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध होण्याची गरज आहे.

Lumpy Disease
Farmer Loan : शेतकऱ्यांचा कर्जबाजारीपणा कमी करण्याचा वेगळा मार्ग

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com