कारंजा बाजारात सोयाबीन आवक मंदावली

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ.
कारंजा बाजारात सोयाबीन आवक मंदावली
soybeanagrowon

कारंजा बाजारात सोयाबीनची आज ३ जून रोजी 2500 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 5750 रुपये तर कमाल 6350 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 6175 रुपयांवर होता.अकोला बाजारात सोयाबीनची(soybean) 1079 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 5900 रुपये होता. तर कमाल भाव 6380 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 6200 चा भाव मिळालाय.तसेच देऊळगावराजा बाजारात सोयाबीनला 5000 रुपये किमान दर(rate) मिळाला. तर कमाल दर6200 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 6000 रुपये मिळाला.

soybean
कापूस दरवाढीचा वस्त्रोद्योगाला फटका

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या बीड बाजारामध्ये आज 3 जून रोजी 58 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 5500 रुपये ते कमाल 6170 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसेच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 5853 रुपयांनी झालेत.तिकडे तुळजापूर बाजारात 155 क्विंटलवर आवक झाली. या आवक मालाला किमान 6000 ,तर कमाल 6200 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 6100 रुपयांचा राहिलाय.दुसरीकडे गंगाखेड बाजारात किमान 6400 रुपये तर कमाल 6700 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 6500 होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com