कारंजा बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा

विदर्भातील प्रमुख बाजारांमधील आजचे सोयाबीन बाजार भाव किती आहेत, जाणून घ्या.
कारंजा बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा

राज्यातल्या बाजार समित्यांमध्ये सोयाबीनला(Soybean) आज किती भाव मिळाले हे जाणून घेऊ. कारंजा बाजारात सोयाबीनची आज 20 एप्रिलला 4800 क्विंटल आवक झाली. आवक झालेल्या सोयीबनला आज किमान 6920 रुपये तर कमाल 7375 रुपये दर मिळालाय. तर सर्वसाधारण दर 7190 रुपयांवर होता. कारंजा बाजारात आज सोयाबीन आवक वाढली होती. अमरावती बाजारात सोयाबीनची 4367 क्विंटल आवक झाली असून किमान भाव 6800 रुपये होता. तर कमाल भाव 7311 रुपयांचा मिळालाय. या मालाला सर्वसाधारण 7055 चा भाव मिळालाय. नागपूर बाजारात आवक 982 क्विंटल राहिली. यावेळी या सोयाबीनला किमान 6300 रुपये दर मिळाला. तर कमाल व्यवहार 7460 रुपयाने झाले. सरासरी दर(Rate) 7176 रुपये मिळाला. तसेच अकोला बाजारातील आवक 1667 क्विंटलवर होती. यावेळी सोयाबीनला 6600 रुपये दर मिळाला. तर कमाल दर 7380 रुपयांवर होते. तर जास्तीत जास्त आवक मालाला सर्वसाधरण दर 7150 रुपये मिळाला.

कारंजा बाजारात सोयाबीन दरात काहीशी सुधारणा
यंदाच्या खरिपात १६३ दशलक्ष टन धान्य उत्पादनाचे उद्दिष्ट

मराठवाड्यातील महत्त्वाच्या सोयाबीन बाजारांपैकी एक असलेल्या उदगीर बाजारामध्ये आज 20 एप्रिलला 5500 क्विंटल सोयाबीन विक्रीसाठी आणलं गेलं. या मालाचे भाव किमान 7220 रुपये ते कमाल 7252 रुपयांच्या दरम्यान राहिले. तसंच आवक मालाचे सर्वात जास्त व्यवहार 7236 रुपयांनी झालेत. तिकडे हिंगोली बाजारात 690 क्विंटल सोयाबीन आवक झाली. या मालाला किमान 6865 तर कमाल 7353 रुपयांचा दर मिळाला. इथं सर्वसाधारण दर 7109 रुपयांचा राहिलाय. दुसरीकडे जिंतूर बाजारात सोयाबीनच्या आवक मालाला किमान 6700 रुपये तर कमाल 7300 रुपयांचा दर होता. तर सर्वसाधारण दर 7000 होता.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com