रखडलेले कृषी प्रशिक्षण संकुल अखेर साकारले

पुण्यातील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण (रामेती) संस्थेचे रखडलेले संकुल अखेर साकारले आहे.
Agriculture Training Complext
Agriculture Training ComplextAgrowon

पुणे ः पुण्यातील प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण (रामेती) संस्थेचे रखडलेले संकुल अखेर साकारले आहे. कृषी सहसंचालक रफिक नाईकवडी व प्राचार्य विनायक देशमुख या दोन अधिकाऱ्यांच्या पाठपुराव्यामुळे उभारणीतील अडथळे दूर झालेल्या या संकुलाचे सोमवारी (ता.१६) लोकार्पण होत आहे.

संकुल लोकार्पण सोहळ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्‍वजित कदम उपस्थित राहणार आहेत. आळंदी भागात चह्रोली येथे काही वर्षांपासून ‘रामेती’ संकुलचे काम सुरू होते. कोट्यवधी रुपये खर्च केल्यानंतर काम मध्येच बंद पडले. वर्षानुवर्षे दुर्लक्ष झाल्यानंतर संकुल आवारात उकरडा तयार झाला आणि जनावरे फिरू लागली होती. त्यामुळे हा प्रकल्प कायमचा गुंडाळल्यात जमा झाला, असे कर्मचाऱ्यांना वाटू लागले. सहसंचालक नाईकवाडी यांच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर त्यांनी कृषी मंत्रालयाकडे पाठपुरावा सुरू केला. रामेती प्राचार्य देशमुख यांनीही त्यात पुढाकार घेतला.

कृषी सचिव एकनाथ डवले व कृषी आयुक्त धीरज कुमार यांनीही संकुलाच्या रखडलेल्या कामाला चालना देण्याचा निर्धार केला. ‘रामेती’च्या नव्या संकुलमुळे पुणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, रायगड व पालघर भागांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांची प्रशिक्षणाची गैरसोय दूर झाली आहे. संकुलाच्या आजूबाजूला तीन हेक्टर क्षेत्रावर आता आंबा, पेरू, सीताफळ, आवळा, नारळ, चिकू लागवडदेखील केली जाणार आहे.

‘रामेती’चे काम नव्या संकुलातून

पुण्यातील शिमला हाउसच्या बाजूला असलेले ‘रामेती’चे सर्व कामकाज आता नव्या संकुलातून केले जाणार आहे. “अधिकाऱ्यांनी केलेल्या एकत्रित पाठपुराव्यातून दहा कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चाचे संकुल तयार होऊ शकले. विभागीय स्तरावर १५ एकर भागांत पसरलेले हे एकमेव मोठे प्रशिक्षण संकुल आहे. कृषी विभागातील कर्मचाऱ्यांना या ठिकाणी प्रशासकीय भवनासह आता अद्ययावत प्रशिक्षण सभागृह, प्रशिक्षणार्थी निवास, ग्रंथालय, संगणक कक्ष उपलब्ध असेल,” अशी माहिती सूत्रांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com