अखेर सहसंचालकपदाच्या रखडलेल्या पदोन्नत्या मार्गी

राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) पदोन्नती देण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती.
Department Of Agriculture
Department Of AgricultureAgrowon

पुणे ः राज्याच्या कृषी विभागातील (Department Of Agriculture) वरिष्ठ अधिकाऱ्यांना सहसंचालकपदी पदोन्नती (Promotion) देण्याची रखडलेली प्रक्रिया अखेर मार्गी लागली आहे. तसेच, मृद्संधारण विभागालादेखील नवा संचालक मिळाला आहे.

राज्यातील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांना (एसएओ) पदोन्नती देण्याची प्रक्रिया गेल्या काही महिन्यांपासून रखडली होती. सरकारदेखील बदलल्यामुळे ही प्रक्रिया आणखी लांबणीवर पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोणताही हस्तक्षेप न करता पदोन्नत्यांचा प्रश्‍न निकाली लावल्याची माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. यामुळे ९ ‘एसएओं’ना आता सहसंचालकपदावर बढती मिळाली आहे.

आकृतिबंधानुसार सहसंचालकांची मंजूर पदे १४ आहेत. मात्र गेल्या वर्षी प्रतिनियुक्तीवरील आणखी पाच पदांना मान्यता मिळाल्यामुळे कृषी विभागातील सहसंचालकांची संख्या आता १९ झाली आहे. पदे मंजूर असूनही नाशिक, ठाणे, पुणे व लातूर विभागांना सहसंचालक दिलेला नव्हता. तर कृषी संचालकपदाच्या बढतीसाठी नागपूरचे विभागीय कृषी सहसंचालक रवींद्र भोसले पात्र असतानाही त्यांचीही फाइल धूळ खात पडली होती.

Department Of Agriculture
देशात अकरावी कृषी गणना डिजिटल पद्धतीने होणार

सूत्रांच्या म्हणण्यानुसार, भोसले यांना मृदसंधारण संचालकपदी येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गैरव्यवहार आणि चौकश्‍या यामुळे सतत चर्चेत असलेल्या मृद्‍संधारण विभागात साफसफाई करण्याची मोठी जबाबदारी भोसले यांच्यावर आली आहे. ते विस्तार कार्यातील हुशार व प्रामाणिक अधिकारी म्हणून कृषी विभागात परिचित आहेत. पीकविमा योजनेतील तज्ज्ञ समजले जाणारे कृषी आयुक्तालयाचे मुख्य सांख्यिक विनयकुमार आवटे आता आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण शाखेचे सहसंचालक बनले आहेत. नाशिकचे सहसंचालकपद मोहन वाघ यांना देण्यात आले आहे. ते पूर्वी ठाणे सहसंचालक कार्यालयात ‘एसएओ’पदी कार्यरत होते.

Department Of Agriculture
Cotton : गुजरातचा कृषी विभाग एचटीबीटी विरोधात सजग

वसंतराव नाईक राज्य कृषी विस्तार व्यवस्थापन संस्थेच्या मनुष्यबळ विकास विभागाचे अपर संचालकपद रिक्त होते. तेथे आता नागपूरच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेचे एसएओ मारुती चपळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. साखर आयुक्तालयातील विकास विभागाचे सहसंचालक पांडुरंग शेळके यांना मृद्‍संधारण विभागाचे सहसंचालकपद मिळाले आहे. कृषिमंत्री दादा भुसे यांचे निकटवर्तीय असलेले एसएओ दर्जाचे अधिकारी रफिक नाईकवाडी यांना आता पुण्यातील अत्यंत मोक्याचे समजले जाणारे विभागीय कृषी सहसंचालकपद मिळाले आहे. या पदाचा अतिरिक्त भार त्यांचेकडे यापूर्वीपासून होता.

तुकाराम मोटे आता सहसंचालक

आयुक्तालयाच्या विस्तार व प्रशिक्षण शाखेचे सहसंचालक क्रमांक तीन रिक्त होते. तेथे आता तुकाराम मोटे यांची नियुक्ती झाली आहे. ते औरंगाबादचे एसएओ होते. औरंगाबादच्या सहसंचालक कार्यालयातील एसएओ आता पूर्णवेळ सहसंचालक म्हणून लातूर विभागाचे कामकाज पाहणार आहेत. पदोन्नतीच्या प्रतीक्षेत असलेले नागपूर आत्माचे प्रकल्प संचालक राजेंद्र साबळे आता नागपूरचे विभागीय सहसंचालक झाले आहेत.

ज्ञानेश्‍वर बोटेंकडे स्मार्टची सूत्रे

विस्तार कामात आघाडीवर असलेले पुण्याचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्‍वर बोटे यांना आता स्मार्ट प्रकल्पाचे अतिरिक्त प्रकल्प संचालकपद मिळाले आहे. गेल्या काही महिन्यांपासून या पदाचे अतिरिक्त कामकाज ‘आत्मा’चे संचालक डॉ. दशरथ तांभाळे सांभाळत होते.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com