Ajit Pawar : लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम सुरू

लोकशाहीला नख लावून गळा घोटण्याचे काम सुरू आहे,’’ असा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी केला
Ajit Pawar
Ajit Pawar Agrowon

नगर : ‘‘स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत ओबीसींना आरक्षण देण्याचे काम महाविकास आघाडीने केले. या आरक्षणाचे श्रेय आरक्षण विरोधी लोक घेऊ पाहत आहेत. त्यांचा बुरखा फाडायला हवा. लोकशाहीत वेळेवर निवडणुका व्हायला हव्यात. निवडणुका न घेणे लोकशाहीला चांगले नाही. लोकशाहीला नख लावून गळा घोटण्याचे काम सुरू आहे,’’ असा घणाघाती आरोप राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी केला

Ajit Pawar
Cotton Rate : कापसाच्या दरात सुधारणा का झाली?

शिर्डी येथील ‘राष्ट्रवादी मंथन वेध भविष्याचा’ या मेळाव्यात पवार बोलत होते. या वेळी उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, कुमार केतकर, अशोक वानखडे, संजय औटी आदींनी मार्गदर्शन केले.

पवार म्हणाले, ‘‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पावसाळ्यातच निवडणुका होणार होत्या. मात्र, त्यावर आक्षेप घेतल्याने त्या निवडणुका स्थगित झाल्या. आता लवकरच या निवडणुका होतील. यासाठी स्वबळावर निवडणूक लढविण्याची तयारी करा. राज्यात आघाडीची सत्ता आणायची आहे. कार्यकर्ते हे पक्षाची ताकद असतात. तेच आमदार व खासदार निवडून आणतात. त्यामुळे पक्ष सभासदांची अधिक नोंदणी वाढवायला हवी. हे शिबिर संपल्यानंतर त्या दृष्टीने कामाला लागा.’’

Ajit Pawar
पीकविमा वेळेत देण्यासाठी काम सुरू ः अजित पवार

‘‘राज्य निवडणूक आयोगाने त्यांची जबाबदारी वेळेवर पार पाडावी. महागाई व बेरोजगारीचे संकट देशात आहे. काही लाख कोटींची गुंतवणूक गुजरातला गेली आहे. आमच्याबरोबर असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नवीन प्रकल्प राज्यात येणार असल्याचे सांगतात. मी स्वतः रतन टाटांना भेटलो होतो. ते राज्यात गुंतवणूक करणार होते. मात्र, सत्ता परिवर्तन होताच राज्यातील २५ हजार ३६८ कोटींचे प्रकल्प गेले. असे असले तरी विरोधक मात्र हिटलरची गोबेल नीती राबवीत आहेत. राज्यातून गेलेल्या प्रकल्पांपेक्षाही मोठे प्रकल्प आणू, असे राज्यातील सत्ताधारी सांगत असले तरी गेलेल्या प्रकल्पांपेक्षा मोठे प्रकल्प आणण्याची धमक सरकारमध्ये नाही,’’ अशी टीका पवार यांनी केली.

‘पक्ष फोडणे अयोग्य’

‘‘ज्या घरात वाढले, त्या घरात फूट पाडणे योग्य नाही. मुख्यमंत्रिपद मिळविणे ठीक, पण पक्ष फोडणे योग्य नाही. हा फक्त शिवसेनेचाच प्रश्न नाही, तर सर्वच पक्षांबाबतची स्थिती आहे. अशा प्रकारामुळे राज्याची प्रतिमा मलिन होत आहे,’’ अशी टीका अजित पवार यांनी केली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com