Yuvamitra : परिवर्तनासाठी कटिबद्ध असणाऱ्या 'युवामित्र'ची कहाणी

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळाचा शिक्का बसलेला तालुका. येथे विडी उद्योग मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला होता. घरोघरी विड्या बांधल्या जात.
Yuvamitra
YuvamitraAgrowon

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर हा दुष्काळाचा शिक्का बसलेला तालुका. येथे विडी उद्योग मोठ्या प्रमाणावर विस्तारलेला होता. घरोघरी विड्या बांधल्या जात. येथे औद्योगिक विकासाला सुरुवात झाली. मात्र सर्वसामान्य माणसाची सामाजिक व आर्थिक प्रगती नव्हती. या परिस्थितीत राष्ट्र सेवा दलाचे (Rashtra Seva Dal) सक्रिय कार्यकर्ते असलेले सुनील पोटे (Sunil Pote) यांनी समविचारी मित्रांना सोबत घेऊन १९९५ मध्ये ‘युवामित्र’ (YuvaMitra Sanstha) या नावाने संस्थेची नोंदणी केली. त्यावेळी ते समाजकार्य महाविद्यालयात शिक्षण घेत होते. प्रत्यक्ष ‘फिल्ड' वर जाऊन प्रश्‍न समजून घेण्यास त्यांनी सुरुवात केली.

त्या वेळी त्यांच्या सोबत मनीषा या प्रमुख सहकारी होत्या. सिन्नर शहरात त्या वेळी वंचित घटकांची मुलं शिक्षण व्यवस्थेतून बाहेर पडत होती. सुनील व मनीषा यांनी या कामावर लक्ष केंद्रित केलं. भटके विमुक्त समाजाच्या मुलांसाठी बॅ. नाथ पै यांच्या नावाने बालवाडी सुरू केली. त्यांनी १९९६ मध्ये नर्मदा बचाव आंदोलनातही सहभाग नोंदवला. त्या वेळी बाबा आमटे, मेधाताई पाटकर यांचा सहवास लाभला.

Yuvamitra
Crop Dmage : पावसामुळे चार हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

सुनील व मनीषा यांनी पूर्णवेळ सामाजिक कार्यात उतरण्याचा संकल्प केला. ते १९९७ मध्ये विवाहबद्ध झाले. पुढे ते उत्तर महाराष्ट्र लोकविकास मंच या संस्थेशी जोडले गेले. त्यानंतर शेतकरी, महिला यांच्या गटबांधणीची कामं सुरू झाली. शेतकरी, ग्रामीण भाग हा त्यांच्या अजेंड्यावरचा विषय राहिला. संस्थेचे संस्थापक सुनील पोटे यांनी २५ वर्षे प्रेरणादायी काम उभं केलं. मात्र २०२० मध्ये त्यांचं अकाली निधन झालं. मात्र मनीषाताईंनी जिद्दीने संस्थेचं काम पुढं सुरू ठेवलं, वाढवलं. आता संस्थेचा विस्तार झाला असून, ९७ जणांची मुख्य टीम आहे.

Yuvamitra
Crop Damage : दिवाळी साजरी न करता नुकसानीची पाहणी करणार : विखे पाटील

ग्रामपातळीवर २०० कार्यकर्ते आहेत. संस्थेशी १ लाख ३३ हजारांपेक्षा अधिक परिवार जोडले गेले आहेत. बांधिलकी, सचोटी, पारदर्शकता, गुणवत्ता, नवकल्पना, शिस्त, जबाबदारी आणि शाश्‍वत विकास या मूल्यांशी बांधिलकी जपत संस्थेची वाटचाल सुरू आहे. त्यामुळेच संस्थेने महाराष्ट्रासह हरियाना, पंजाब, आंध्र प्रदेश, हिमाचल प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक या राज्यांतही कामाचा विस्तार केला आहे.

सामाजिक प्रश्‍नावर शोधले उत्तर

सुनील व मनीषा यांना करियरच्या अनेक संधी आल्या होत्या; पण ग्रामीण भागाच्या विकासासाठीच काम करायचं, हा त्यांचा निश्‍चय पक्का असल्याने त्यांनी त्या नाकारल्या. २०११ मध्ये ‘क्षणोक्षणी शिक्षण’ या प्रकल्पासाठी काम करण्याची संधी ‘युवामित्र’ला मिळाली. विद्यार्थ्यासोबत हा प्रकल्प यशस्वीरीत्या राबविल्याने कौतुकाची थाप मिळाली. मनीषा यांनी रामनगर (ता. सिन्नर) येथे दारूबंदी करून गावठी दारूनिर्मिती बंद करण्याचा ठराव केला. त्यामुळे संस्थेच्या कामात तरुणांचा सहभाग वाढत गेला.

स्थानिक तरुणाईच्या समोरील बेरोजगारी व इतर सामाजिक प्रश्‍नांना संस्थेने हात घातला. सामाजिक प्रश्‍न व सोबत बलस्थाने अभ्यासून काम हाती घेतले. शेती हे ग्रामीण भागातील रोजगाराचे प्रमुख साधन असल्याने संस्थेकडून तरुणांना सोबत घेऊन शिवारफेरींचे आयोजन केले जायचे. त्यावेळी तरुण सांगायचे, मी नोकरी करणार; पण शेती करणार नाही. गावात शेतीला पाणीच नाही, तर ही शेती का करू? शेतीला व्यवसायिक प्रतिष्ठा नाही, त्यामुळे समाज हिणावतो, असे मुद्दे समोर आले. या पार्श्‍वभूमीवर ‘युवामित्र’ने शेती क्षेत्रात काय करता येईल, यावर काम सुरू केले.

देवनदी शोधयात्रा

‘युवामित्र’ने शेती प्रश्‍नांचा सखोल अभ्यास करण्यासाठी २००७ मध्ये सिन्नर तालुक्यात खोपडी ते धोंडबारे अशी ‘देवनदी शोधयात्रा’ काढली. या वेळी लोकांशी संवाद साधून सविस्तर माहिती संकलित करण्यात आली. त्याआधारे दहा गावांचा छोटेखानी माहितीपर इतिहास लिहिला गेला. त्यातून असे लक्षात आले, की १२ महिने वाहणारी जीवनदायिनी देवनदी येथे होती. त्यामुळे तिच्या काठी मोठी वस्ती झाली. पण आता या नदीची वाईट अवस्था होऊन तिचा ओहोळ झाला होता.

या नदीवर ब्रिटिशांनी बांधलेले बंधारे मोडकळीस आले होते. ही कामे पुनर्स्थापित करण्यासाठी पहिल्यांदा १०० वर्षांपूर्वीचे दस्तावेज गोळा करून आराखडे, वितरण प्रणाली, दुरुस्ती यांची माहिती संकलित केली. बंधाऱ्यांची दुरुस्ती केली. त्यामुळे देवनदी पुन्हा वाहती झाली. त्यामुळे परिसरातील भूजलपातळी वाढली. शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. त्यामुळे पडीक जमीन बागायती झाली. त्यातून खऱ्या अर्थाने शेतकरी व ‘युवामित्र’चे नाते बळकट झाले. शेतकऱ्यांना संघटित करून बहुपीकपद्धती रूजवल्याने जोखीम कमी होऊन शेतकऱ्यांचं अर्थकारण सुधारलं. शेतीपूरक जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय सुरू झाला....

(सविस्तर लेख वाचा अॅग्रोवनच्या दिवाळी अंकात.)

अॅग्रोवनचा दिवाळी अंक अॅमेझोन वर उपलब्ध.

अंक खरेदीसाठी खालील लिंकवर क्लिक करा -

अॅमेझोन लिंक- https://www.amazon.in/Agrowon-Diwali-ank-Shetmal-vikrichya/dp/8190638173

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com