Weather Upadate : तापमान घसरणार; थंडी वाढेल

थंडीचे प्रमाण वाढण्यास सर्व बाबी अनुकूल आहेत.
Weather Upadate
Weather UpadateAgrowon

महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात वाढ झाली असून, ते आठवडाभर १०१२ हेप्टापास्कल इतके राहतील. तापमानात घट (Temperature Slow Down) होते तेव्हा हवेचे दाब वाढतात. हवेच्या दाबाचा तापमानाशी थेट संबंध असतो. हिंदी महासागरावर १०१० हेप्टापास्कल इतका हवेचा दाब आहे. वारे जास्त हवेच्या दाबाकडून कमी हवेच्या दाबाच्या दिशेने वाहतात. ईशान्य भारतावर १०१४ हेप्टापास्कल इतका अधिक हवेचा दाब राहण्यामुळे वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून दक्षिणेकडे राहील. उत्तर भारतावरील हवेचे दाब वाढत आहेत. भारतातील उत्तर दिशेकडील प्रदेशात हवेचे दाब १०१४ हेप्टापास्कल इतके वाढत आहेत. त्यामुळे यापुढील काळात थंड वारे उत्तर दिशेकडून दक्षिण दिशेकडे वाहतील. चांगल्या थंडीसाठी या बाबी अनुकूल आहेत. यापुढे कमाल व किमान तापमान सरासरीपेक्षा कमी नोंदले जाईल. प्रामुख्याने विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र व कोकणात कमी तापमान नोंदले जाण्याची शक्यता आहे. सध्या कमाल तापमान सरासरीपेक्षा ३.१ अंश सेल्सिअसने कमी, तर किमान तापमानही १.६ अंश ते ३ अंश सेल्सिअसने कमी नोंदले जाईल. थंडीचे प्रमाण वाढण्यास सर्व बाबी अनुकूल आहेत.

Weather Upadate
Crop Damage : दोन लाखांवर हेक्टरवरील पिकांचे नुकसान

कोकण ः
कमाल तापमान सिंधुदुर्ग व रायगड जिल्ह्यांत ३५ अंश सेल्सिअस, तर रत्नागिरी, ठाणे व पालघर जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान रत्नागिरी, रायगड व ठाणे जिल्ह्यांत २२ अंश सेल्सिअस तर पालघर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६७ टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३४ ते ४३ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ६ ते १० कि.मी. आणि दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही. सध्याचे हवामान भात, आंबा, काजू, फणस या पिकांना अत्यंत पोषक राहील.

Weather Upadate
Crop Damage : यंदा वऱ्हाडात १०० टक्क्यांवर पाऊस

उत्तर महाराष्ट्र ः
कमाल तापमान नाशिक, धुळे व नंदूरबार जिल्ह्यांत ३४ अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान नाशिक व धुळे जिल्ह्यात १९ ते २० अंश सेल्सिअस, तर जळगाव जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस, नंदूरबार जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ४२ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २१ ते ३० टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ४ ते ६ किमी आणि दिशा आग्नेयेकडून राहील. सध्याची हवामान स्थिती कापूस पिकास अनुकूल आहे.


मराठवाडा ः
उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत कमाल तापमान ३१ अंश सेल्सिअस, तर नांदेड, परभणी, हिंगोली व जालना जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान उस्मानाबाद, लातूर, बीड, औरंगाबाद जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअसपर्यंत घसरेल. नांदेड, परभणी, हिंगोली, जालना जिल्ह्यांत किमान तापमान २२ अंश सेल्सिअस राहील. सर्वच जिल्ह्यांत आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ६७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३५ ते ४० टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते १० कि.मी. राहील. उस्मानाबाद जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग अधिक राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही. सध्याची हवामान स्थिती कापूस वेचणीसाठी उत्तम राहील.

Weather Upadate
Crop Damage : हाती पैसा नसल्याने दिवाळी अंधारात

पश्‍चिम विदर्भ ः
कमाल तापमान बुलडाणा, अकोला, वाशीम व अमरावती जिल्ह्यांत ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान अकोला व अमरावती जिल्ह्यांत १८ अंश सेल्सिअस, तर बुलडाणा जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस आणि वाशीम जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५४ ते ५७ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते २९ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग २ ते ३ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने आग्नेयेकडून व ईशान्येकडून राहील. कापूस वेचणीस हवामान अनुकूल राहील.


मध्य विदर्भ ः
यवतमाळ, वर्धा व नागपूर जिल्ह्यात कमाल तापमान ३२ ते ३३ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान वर्धा व नागपूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील आणि यवतमाळ जिल्ह्यात १९ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ५८ ते ६० टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३१ ते ३६ टक्के राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ५ किमी राहील. वाऱ्याची दिशा प्रामुख्याने ईशान्येकडून व आग्नेयेकडून राहील. कपाशी वेचणीस व हरभरा पेरणीस हवामान अनुकूल राहील.

पूर्व विदर्भ ः
कमाल तापमान चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा व गोंदिया जिल्ह्यांत ३२ अंश सेल्सिअस, तर किमान तापमान १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६० ते ६८ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता २७ ते ४० टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग ३ ते ४ किमी आणि दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही. पूर्व विदर्भातील भात पिकाच्या हळव्या वाणांची काढणी करावी.

दक्षिण-पश्‍चिम महाराष्ट्र ः कमाल तापमान कोल्हापूर जिल्ह्यात ३४ अंश सेल्सिअस, सांगली जिल्ह्यात ३२ अंश सेल्सिअस, तर सातारा, सोलापूर, पुणे व नगर जिल्ह्यांत ३१ अंश सेल्सिअस राहील. किमान तापमान सांगली जिल्ह्यात २१ अंश सेल्सिअस, कोल्हापूर जिल्ह्यात २३ अंश सेल्सिअस, तर सोलापूर जिल्ह्यात १८ अंश सेल्सिअस राहील. आकाश निरभ्र राहील. सकाळची सापेक्ष आर्द्रता ६२ ते ७१ टक्के, तर दुपारची सापेक्ष आर्द्रता ३२ ते ४९ टक्के राहील. त्यामुळे हवामान कोरडे राहील. वाऱ्याचा ताशी वेग सांगली, सातारा व कोल्हापूर जिल्ह्यांत ९ ते १० कि.मी., सोलापूर जिल्ह्यात ११ कि.मी. तर पुणे व नगर जिल्ह्यांत ६ ते ७ कि.मी. राहील. वाऱ्याची दिशा ईशान्येकडून राहील. पावसाची शक्यता नाही.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com