तिघांचे बळी घेणारा वाघ जेरबंद

ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालून तिघांना ठार करणाऱ्या एका वाघास वनविभागाने अड्याळ-भगवानपूर शेतशिवारात जेरबंद केले.
Tiger Attack
Tiger AttackAgrowon

ब्रह्मपुरी, जि. चंद्रपूर ः ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रात धुमाकूळ घालून तिघांना ठार करणाऱ्या एका वाघास (Tiger) वनविभागाने अड्याळ-भगवानपूर शेतशिवारात जेरबंद केले. या वाघाची वैद्यकीय चाचणी झाल्यानंतर चंद्रपूर येथील ट्रांझिट ट्रीटमेंट सेंटर येथे पुढील कार्यवाहीसाठी स्थलांतरित करण्यात येणार आहे. ‘टी १०३ सॅम एक’ असे जेरबंद वाघाचे नाव आहे. तो दोन ते अडीच वर्षांचा आहे. वाघाला जेरबंद करण्यात आल्याने नागरिकांनी सुटकेचा निःश्‍वास सोडला आहे.

Tiger Attack
Leopard : उंडवडी परिसरात बिबट्याची दहशत

उत्तर ब्रह्मपुरी वनपरिक्षेत्रातील अड्याळ, दुधवाही, तुमडीमेंढा परिसरात गेल्या काही महिन्यांपासून या वाघाने धुमाकूळ घातला होता. या वाघाने २८ जून रोजी तुमडीमेंढा जंगल परिसरात शौचासाठी गेलेल्या ताराचंद चंदनखेडे याच्यावर हल्ला करून ठार केले. १६ ऑगस्ट रोजी दूधवाही येथील मुखरू राऊत यांनाही वाघाने ठार केले. १७ ऑगस्ट रोजी अड्याळ शेतशिवारात विलास रंद्ये या शेतकऱ्यावर वाघाने हल्ला करून ठार केले. वाघाच्या हल्ल्यात तिघे ठार झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी वनविभागावर चांगलाच संताप व्यक्त केला होता.

Tiger Attack
Leopard: वडगाव काशिंबेत भर वस्तीत बिबट्याचा वावर

चंद्रपूर येथील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे, सशस्त्र पोलिस अजय मराठे यांनी या नर वाघाला अचूक निशाणा साधून बेशुद्ध केले. वाघ बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सकाळी साडेसात वाजता पिंजऱ्यात सुखरूपरीत्या बंद करण्यात आले.

ही कारवाई उपवनसंरक्षक दीपेश मल्होत्रा, सहायक वनसंरक्षक एम. बी. चोपडे, वनपरिक्षेत्र अधिकारी रामचंद्र शेंडे, राकेश आहुजा, आर.आर.टी. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कर्मचारी, क्षेत्रीय अधिकारी व कर्मचारी यांनी केली. वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्याला ट्रांझिट ट्रिटमेंट सेंटर येथे पुढील कार्यवाहीसाठी स्थलांतरित करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com