
Alibaug News : सागरी किनारपट्टीवरील शेतीची उत्पादकता (Agricultural producers) वाढवताना तापमान वाढीचा धोका पोहचू नये, यासाठी संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम (United Nations Development Programme) रायगड जिल्ह्यात (Raigad) शेतकऱ्यांना प्रशिक्षित केले जात आहे.
श्री व एसआरटी तंत्रज्ञानाने शेती (Farming) कशी करावी, यासाठी कृषी विभाग व वन विभागाच्या कांदळवन कक्षाकडून अलिबाग (Alibag) तालुक्यातील ६१ गावांमध्ये शिबिरे घेतली जात आहेत.
समुद्र किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात कांदळवने आहेत. या वनांचे महत्त्व अबाधित ठेवून विविध पिके घेण्यासाठी मोहीम सुरू आहे.
युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम अंतर्गत उपलब्ध झालेल्या ग्लोबल क्लायमेट फंड (यूएनडीएफ-जीसीएफ)च्या माध्यमातून अलिबाग तालुक्यातील शेतकऱ्यांना समुद्रकिनारी कोणती पिके घ्यावीत, याची माहिती दिली जात आहे.
या प्रकल्पाअंतर्गत किनारपट्टीवरील गावांमध्ये भातशेती, मत्स्यशेती, कांदळवन संवर्धन, यांसारखे उपक्रम राबवण्यात येणार आहे.
यामध्ये भातशेतीचे उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशाने भात तंत्रज्ञानाच्या सुधारित ‘श्री’ व ‘एस आर टी’ पद्धतीबाबत प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येत आहे.
अलिबाग तालुक्यातील महाजने येथे झालेल्या मार्गदर्शन शिबिराला जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी उज्ज्वला बाणखेले, उपसंचालक जिल्हा अधीक्षक कृषी दत्तात्रेय काळभोर, उपविभागीय कृषी अधिकारी कैलाश वानखेडे, अलिबाग तालुका कृषी अधिकारी प्रदीप बैनाडे, पोयनाड मंडळ कृषी अधिकारी हर्षाली सावंत, नागाव मंडळ कृषी अधिकारी रघुनाथ जाधव, कृषी पर्यवेक्षक मोहन सूर्यवंशी, भाऊसाहेब गरांडे, सर्जेराव बागाव, रघुनाथ जाधव, कृषी सहायक पी. एम. बनबरे, एस. वी. वगरे आदी उपस्थित होते. या शिबिराला शेतकऱ्यांची उपस्थिती लक्षणीय होती.
६१ गावांमध्ये कृषीविषयक प्रशिक्षण
यूएनडीएफ-जीसीएफअंतर्गत अलिबाग तालुक्यातील वाडगाव, देवघर, वनवली, वरंडेपाडा, वरंडे, कुर्डुस, सांबरी, आवेटी, कोपरी, बिडवागळे, धवर, नवेदार बेली, सहाण, महाण, बोरघर, खंडाळे, कुंठ्याची गोठी, वढाव खु., भादाणे, काविर, वढाव बु., बामणगाव, चरी, कुसुंबळे, कोपर, कोळटेंबी, शहापूर, श्रीगाव, उत्तर चौल, दक्षिण चौल, रेवदंडा, पाल्हे, लोणारे, नागाव, बागमळा, डावाळे, आक्षी, झिराडपाडा, सातिर्जे, अगर्सुरे, बामणसुरे, झिराड, किहीम, कुणे, मल्याण, उसर, खाणाव, कामार्ले, रांजणखार, वाघोली, चींचवली, केतकीचा मळा, बेलोशी, मान ते झिराड, म्हात्रोली, कोळगाव, वळवली, महाजने, बहिरोळे, बेलकडे, मांडावे ते बामणगाव या ६१ गावांमध्ये कृषीविषयक प्रशिक्षण होणार आहे.
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.