कृषी धोरणात अमेरिका आणि भारताचे महिला व्यासपीठ हवे

माणदेशी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘अमेरिका-भारत कृषी व्यापार आणि हवामान बदल परिषद’ यामध्ये दूरदृश्‍य प्रणालीद्वारे डॉ. गोऱ्हे बोलत होत्या.
Nilam Gorhe
Nilam GorheAgrowon

पुणे ः ‘‘भारतीय कृषी उद्योग (Indian Agriculture Industry) आणि शेतीमध्ये स्त्रियांचे योगदान (Contribution Of women In Agriculture) मोठे आहे. त्यांच्यासह शेतीच्या विकासासाठी देशाच्या धोरणात (Agriculture Policy) अधिकाधिक प्रयत्न झाले पाहिजेत. त्यात अमेरिका आणि भारताचे महिला व्यासपीठ आवश्यक आहे,’’ असे मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे (Dr. Nilam Gorhe) यांनी व्यक्त केले.

माणदेशी फाउंडेशनच्या वतीने आयोजित ‘अमेरिका-भारत कृषी व्यापार आणि हवामान बदल परिषद’ यामध्ये दूरदृश्‍य प्रणालीद्वारे डॉ. गोऱ्हे बोलत होत्या. परिषदेमध्ये उद्योगमंत्री सुभाष देसाई, अमेरिकेतील तज्ज्ञ श्रीमान स्टीव्ह डेन्स, माणदेशी फाउंडेशनच्या संस्थापक चेतना सिन्हा, यूएस-भारत स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप फोरमचे अध्यक्ष मुकेश अघी, साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंग, पर्यावरण संरक्षण निधी मुख्य सल्लागार हिशाम मुंडोल, जेफ्री रम्नी, ब्रायन कुहेल, के. कोई इसोम, माणदेशी फाउंडेशनचे करण सिन्हा, अनघा कामत आदी सहभागी झाले.

डॉ. गोऱ्हे म्हणाल्या, ‘‘देशाच्या सामाजिक व आर्थिक इतिहासात कृषी आणि कृषी क्षेत्रातील महिलांचे मोठे योगदान आहे. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कांसाठी देशात विविध आंदोलने झाली. या आंदोलनांमध्ये महाराष्ट्रासह, पंजाब, हरियाना, हिमाचल, पश्‍चिम बंगाल, केरळ, आंध्र प्रदेशातील शेतकरी शेतमजूर महिलांची आंदोलने प्रसिद्ध आहेत. १९७५ मध्ये स्टेटस आॅफ वुमन समितीच्या अहवालात महिलांच्या शेतीविषयक श्रम व त्यांच्या योगदानाचे नोंद घेतली आहे.’’

‘‘देशाच्या ग्रामीण भागात शेतीमध्ये आजवर लाखो महिलांचे असलेले कष्टप्रद योगदान त्यांच्या कुटुंबासाठी आणि स्वत:च्या विकासासाठी खूप महत्त्वाचे ठरले आहे. अनेक सामाजिक चळवळीच्या माध्यमातून त्यांचे योगदान ओळखले जाते. भारतीय महिलांनी संघर्षातून विकासाच्या विविध चळवळींमध्ये दिलेले ऐतिहासिक योगदान उल्लेखनीय आहे,’’ असेही डॉ. गोऱ्हे म्हणाल्या. ज्येष्ठ पत्रकार कविता अय्यर यांनी सूत्रसंचालन केले.

‘ऊसतोड महिलांसाठी विशेष महामंडळ’

‘‘महाराष्ट्र सरकारने ऊस तोडणी कामगारांसाठी महामंडळाची स्थापना केली आहे. ऊसतोडणी कामगारांमध्ये महिलांची संख्या मोठी आहे. ऊसतोड कामगार महिलांचे गर्भाशय काढून टाकण्याच्या घटना घडल्या आहेत. वयाच्या २५ व्या वर्षी तिच्या आयुष्यात गर्भाशय काढून टाकण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात येतो, हे खूप भयानक आहे. यावर राज्य शासनाने नेमलेल्या समितीच्या माध्यमातून ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत,’’ अशी माहिती या वेळी डॉ. गोऱ्हे यांनी दिली.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com