...तर नक्कीच राष्ट्रीय क्रांती होऊ शकेल

देशात विविध माध्यमांतून येणारे चांगले उत्पन्न असलेल्या मध्यमवर्गीयांना देशात क्रांतीची गरज आहे, असे वाटणारच नाही.
Kumar Keatkar
Kumar KeatkarAgrowon

पुणे : ‘‘देशात विविध माध्यमांतून येणारे चांगले उत्पन्न (Income) असलेल्या मध्यमवर्गीयांना देशात क्रांतीची (Need To Revolution) गरज आहे, असे वाटणारच नाही. त्यांची संख्या ४० ते ५० कोटी आहे. मात्र ज्यांना क्रांतीची गरज आहे, त्यांच्यापर्यंत परिवर्तनाचे विचार गेले पाहिजेत. समाजातील उदासीनता आणि नकारात्मक विचार दूर करून काम केले तर नक्कीच राष्ट्रीय क्रांती होऊ शकेल,’’ असा विश्‍वास ज्येष्ठ पत्रकार खासदार कुमार केतकर (Kumar Ketkar) यांनी व्यक्त केला.

प्रफुल्ल कदम यांनी लिहिलेल्या ‘राष्ट्रीय क्रांतीचा नवा प्रस्ताव’ या पुस्तकाचे प्रकाशन राज्यातील विविध भागांतील व पक्षातील ग्रामपंचायत सदस्य, नगरपालिका व महानगरपालिकेतील नगरसेवक यांच्या हस्ते प्रतिनिधिक स्वरूपात शुक्रवारी (ता.१६) करण्यात आले. त्या वेळी केतकर बोलत होते. अध्यक्षस्थानी ‘मगरपट्टा सिटी ग्रुप’चे व्यवस्थापकीय संचालक सतीश मगर होते.

Kumar Keatkar
Agriculture Machinery : कृषी अवजारांवर होतेय सातत्यपूर्ण संशोधन

या वेळी अमरावतीच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सुरेखा ठाकरे, ज्येष्ठ पत्रकार यमाजी मालकर, माजी कर्नल गिरिधर कोल्हे, वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषदेच्या (सीएसआयआर) सदस्य डॉ. चंदा निंबकर आणि ज्ञानप्रबोधिनीचे सचिव सुभाष देशपांडे उपस्थित होते. केतकर म्हणाले, ‘‘अतिशय चांगल्या क्रांतिकारक योजना मागे पडल्या आहेत. या सर्व बाबी पुस्तकात नेमक्या पद्धतीने मांडण्यात आल्या आहेत.

Kumar Keatkar
Agriculture Drone : शासन ‘ड्रोन शेती’च्या प्रसारासाठी प्रयत्न करणार

पुस्तकातील हे प्रस्ताव स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्यांपर्यंत गेले पाहिजे. या सर्व बाबींची ते भविष्यात अंमलबजावणी करू शकतात.’’ कदम म्हणाले, ‘‘विकासाच्या चळवळीची वैचारिक भूमिका पुस्तकात मांडण्यात आली आहे. याद्वारे सहा मागण्या केल्या आहेत.’’ योगेश पाटील यांनीे सूत्रसंचालन केले. प्रफुल्ल कदम यांनी आभार मानले.

‘गावाच्या विकासाचा मास्टर प्लॅन तयार व्हावा’

‘‘ग्रामपंचायत सदस्य, नगरसेवकांना निधी मिळायला पाहिजे. या पुस्तकातील प्रस्तावाबरोबर प्रत्येक गावाच्या विकासाचा मास्टर प्लॅन झाला पाहिजे. तरच ग्रामसेवक, सदस्य यांना निधीची अंमलबजावणी करता येईल. विकासाचे नियोजन गावापर्यंत जात नाही, तोपर्यंत मोठ्या शहरांचा सर्वांगीण विकास होणार नाही. सध्या केंद्रित विकास होत आहे, त्याचे विकेंद्रीकरण झाले पाहिजे. प्रणालीत मूलभूत बदल होत नाही. तोपर्यंत आपण त्याच त्याच बाबींच्या सभोवताली फिरत राहू,’’ असे सतीश मगर म्हणाले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com