Nashik News : ऊर्जा विषयात संशोधनास मोठा वाव : भुसे

टाकाऊ वस्तूंपासून ऊर्जानिर्मितीदेखील शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक उर्जेची उत्पादन किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य माणसाला परवडतील अशी असावी.
Nashik News
Nashik NewsAgrowon

नाशिक : दिवसेंदिवस विजेची कमतरता (Electricity Shortage) भासत असून नैसर्गिक ऊर्जास्रोत कधीतरी संपणार असून मानवाने निसर्गाची चालवलेली ओरबाड थांबवून निसर्गाने दिलेल्या साधनसंपत्तीचा वापर मानवी वापरासाठी केल्यास सकारात्मक परिणाम (Positive Effect) दिसतील.

उर्जा विषयात संशोधनाला मोठा वाव असून तरुणांनी व विद्यार्थ्यांनी पुढाकार घेऊन देशाचे भविष्य बदलण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन पालकमंत्री दादा भुसे (Minister Dada Bhuse) यांनी केले.

महाराष्ट्र नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी प्रोड्युसर्स असोसिएशन (एम.एन.इ.पी.ए.) मराठा विद्या प्रसारक समाज संस्था (मविप्र), महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण (मेडा), छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रीय स्मारक समिती, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘अपारंपरिक उर्जेची निर्मिती व वापर’ या विषयावरील दोन दिवसीय कार्यशाळेचे आयोजन कर्मवीर बाबूराव ठाकरे अभियांत्रिकी महाविद्यालयात करण्यात आले होते.

या कार्यशाळेच्या समारोपप्रसंगी भुसे बोलत होते. या वेळी माजी मंत्री विजय नवल पाटील, कोंडाजीमामा आव्हाड, रवींद्र जगताप, मिलिंद पाटील, ओम देशमुख, भागवत बाबा बोरस्ते, विलास बोरस्ते, समन्वयक उदय रकिबे, अनिल जाधव, शिक्षणाधिकारी डॉ. डी. डी. लोखंडे, प्राचार्य डॉ. एस. आर. देवने, प्राचार्य डॉ. आय. बी. चव्हाण, प्राचार्य ज्योती लांडगे आदी उपस्थित होते. अध्यक्षस्थानी मविप्र संस्थेचे सभापती बाळासाहेब क्षीरसागर होते.

भुसे म्हणाले, की निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीसमोर अवकाळी पाऊस, रोगराई यासारखी संकटे उभी राहिली असून शेतीमधून वीजनिर्मिती करणारे मॉडेल विकसित करण्यासाठी प्रयत्न करावे.

तसेच टाकाऊ वस्तूंपासून ऊर्जानिर्मितीदेखील शक्य असल्याचे त्यांनी सांगितले. नैसर्गिक उर्जेची उत्पादन किंमत जास्त असल्याने ती सर्वसामान्य माणसाला परवडतील, अशी असावी.

Nashik News
Mahavitaran : कर्तव्यात कसूर केल्याने वीज अभियंता निलंबित

त्यासाठी शासनस्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल. दैनंदिन शिक्षण घेत असताना समाजाच्या उपयोगी पडेल असे संशोधन व्हावे, ज्यातून राज्याला दिशा मिळेल.

सौर उत्पादकांच्या मागण्या व ठराव शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी शक्य ती मदत केली जाईल. अध्यक्षीय मनोगतात क्षीरसागर म्हणाले, की नाशिक जिल्हा शेतीप्रधान असून महावितरणच्या माध्यमातून असणाऱ्या अंतराच्या अटीबाबत सुधारणा व्हावी तसेच ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना अनुदान वाढून मिळावे.

अपारंपरिक ऊर्जा वापराबाबत सकारात्मकतेने विचार करावा. सूत्रसंचालन प्रा. पंकज शेटे यांनी केले. आभार डॉ. अमोल काकडे यांनी मानले.

शासनाच्या ‘कुसुम’ योजनेत सुधारणा करावी

माजी मंत्री पाटील यांनी प्रास्तविक केले. या वेळी ते म्हणाले, की अपारंपरिक उर्जेच्या संदर्भातील २४ वे अधिवेशन भरविले असून उत्पादक, विक्रेते व सरकार यांच्यामधील दुवा म्हणून कार्य करणे हा उद्देश आहे.

शासनाकडून सुरू असलेल्या कुसुम योजनेत सुधारणा करावी, नवीन उद्योजकांना अनुदान द्यावे व ज्यादा दराने सोलरवरील तयार वीज खरेदी करावी, असे ३ ठराव करण्यात आल्याचे त्यांनी या वेळी सांगितले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com