Weather Update : राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता

मॉन्सून सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे.
Weather Update
Weather Update Agrowon

पुणे : मॉन्सून (Monsoon) सक्रिय झाल्याने राज्यात पावसाचा जोर (Rain Forecast) वाढण्याची शक्यता आहे. आज (ता. ७) दक्षिण कोकण व लगतच्या घाटमाथा, पूर्व विदर्भात जोरदार पावसाचा इशारा (ऑरेंज अलर्ट) (Heavy Rain Orange Alert) देण्यात आला आहे. तर कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने (Weather Department) वर्तविली आहे.

Weather Update
Cotton : शेतकरी पीक नियोजन : कपाशी

मॉन्सूनचा आस असलेल्या कमी दाबाचा पट्टा दक्षिणेकडे कायम आहे. राजस्थानच्या जैसलमेरपासून, पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरापर्यंत विस्तारला आहे. दक्षिण महाराष्ट्रापासून उत्तर केरळपर्यंत किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. कर्नाटक आणि परिसरावर तसेच राजस्थानमध्ये चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.

Weather Update
Soybean: सोयाबीनवर पिवळा मोझॅक रोग पडलाय का ?

कमी दाब क्षेत्राचे संकेत

आंध्र प्रदेशच्या किनाऱ्यालगत बंगालच्या उपसागरात समुद्र सपाटीपासून ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. त्यामुळे आज (ता. ७) या भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याचे संकेत आहेत. उद्या (ता.८) या प्रणालीची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे.

जोरदार पावसाचा इशारा ( ऑरेंज अलर्ट) :

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, कोल्हापूर, चंद्रपूर, गडचिरोली.

जोरदार पावसाचा इशारा (येलो अलर्ट) :

पालघर, ठाणे, मुंबई, नाशिक, परभणी, नांदेड, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा, नागपूर, गोंदिया, भंडारा.

विजांसह पावसाची शक्यता (येलो अलर्ट) :

बुलडाणा, वाशीम.

कोकणात मुसळधार पाऊस

मॉन्सूनच्या पावसाने पुनरागमन केल्यानंतर कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर अधिक असल्याने नद्यांना पूर आला आहे. रत्नागिरीतील लांजा, रामेश्वर, रायगडमधील रोहा येथे १०० मिलिमीटर पेक्षा अधिक पाऊस झाला. कोल्हापूर जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर, तसेच विदर्भातील नागपूर येथे जोरदार पाऊस झाला आहे.

राज्यात शनिवारी (ता. ६) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये पडलेला पाऊस, मिलिमीटरमध्ये (स्रोत : हवामान विभाग) :

कोकण :

पालघर : तलासरी ५९.

रायगड : माणगाव ६२, म्हसळा ६८, पोलादपूर ५०, रोहा १०२, श्रीवर्धन ६४.

रत्नागिरी : दापोली ५५, गुहागर ७७, लांजा १२८, मंडणगड ५०, रत्नागिरी ६७, संगमेश्वर ७४, वाकवली ५५.

सिंधुदुर्ग : देवगड ५०, दोडामार्ग ५६, कणकवली ५३, कुडाळ ६३, मालवण ९५, रामेश्वर ११३, सावंतवाडी ७५, वैभववाडी ६२, वेंगुर्ला ६८.

ठाणे : कल्याण ४६.

.....

मध्य महाराष्ट्र :

नगर : पारनेर ५३,

धुळे : धुळे ३६, साक्री ४२.

कोल्हापूर : चंदगड ४२, गगनबावडा ९७, राधानगरी ३३.

नंदूरबार : नवापूर ३५.

नाशिक : इगतपुरी ४०.

पुणे : दौंड ८९, लोणावळा कृषी ५२,

सातारा : कराड ३५, महाबळेश्वर ३३,

सोलापूर : माळशिरस ४६

....

मराठवाडा :

औरंगाबाद : औरंगाबाद ४७.

....

विदर्भ :

अमरावती : वरुड ४८.

गडचिरोली : आरमोरी ३४.

नागपूर : कळमेश्वर ३३, काटोल ७६, नरखेड ६८, पारशिवनी ३१, रामटेक ६६.

वर्धा : आष्टी ३१.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com