पणन अधिनियमात तातडीने सुधारणा करण्याची गरज

शेतमालाची खरेदी होताना खरेदीदारांकडून फसवणूक होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. जुने पणन कायदे त्याला कारणीभूत असल्याचे दिसत आहे.
APMC
APMC Agrowon

नगर ः शेतमाल खरेदीदारांकडून होणारी फसवणूक टाळण्यासाठी पणन अधिनियमात (Marketing Act) सुधारणा करावी, दुर्मिळ होत चाललेल्या जाती व संपुष्टात येत चाललेले मौलिक वाणांचे संवर्धन करावे, बियाण्यांबाबत शेतकऱ्याला स्वावलंबी करून संवर्धनाचा कृती आराखडा तयार करावा, शेतीला किमान १२ तास पूर्ण दाबाने वीजपुरवठा (Electricity Supply) करावा, असे महत्त्वपूर्ण ठराव भारतीय किसान संघ प्रदेश बैठकीत करण्यात आले.

APMC
‘पणन’च्या सूचनांकडे बाजार समित्यांचा काणाडोळा

भारतीय किसान संघाच्या महाराष्ट्र प्रांताच्या बैठकीत कृषीविषयक अनेक विषयांवर चिंतन करण्यात आले. महाराष्ट्राचे प्रभारी कैलास धक्कड (राजस्थान), प्रांताध्यक्ष बळिराम सोळुंके, प्रदेश संघटनमंत्री दादा लाड, महामंत्री मदन देशपांडे, नाना जाधव या वेळी उपस्थित होते.

APMC
उत्पादकता महत्त्वाची की फायदेशीर पणन?

शेतमालाची खरेदी होताना खरेदीदारांकडून फसवणूक होत असल्याचे सातत्याने दिसून येत आहे. जुने पणन कायदे त्याला कारणीभूत असल्याचे दिसत आहे. पणन सुधारणा करणे गरजेचे आहे. देशात व राज्यात अनेक जुने वाण जतन होणे गरजेचे आहे. मात्र ते होत नाहीत. त्यासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी या वेळी करण्यात आली.

भरडधान्ये, त्यांचे मानवी आहारातील पोषण महत्त्व आणि राज्यात घटत चाललेल्या लागवड क्षेत्राबाबत या वेळी चिंता व्यक्त करण्यात आली. किसान संघाच्या प्रयत्नातून क्षेत्र वाढवणे, त्यावर प्रक्रिया उद्योग उभारणे, त्याची मूल्यसाखळी विकसित करणे, या बाबत योजना बनवण्यात आली. दोन दिवसीय व्यापक बैठकीत जिल्हा व तालुका पदाधिकारी उपस्थित होते. काही ठराव, प्रबोधनात्मक मांडणी व संघटनात्मक कार्याचा गतवर्षाचा आढावा, पुढील वर्षाचे नियोजन करण्यात आले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com