Weather Update : राज्यात पावसाची शक्यता नाही

राज्याच्या बऱ्याच भागात सध्या ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन काढणी आणि रब्बी पेरणीच्या कामात असलेल्या शेतकरी धास्तावले आहेत.
Weather Update
Weather UpdateAgrowon

पुणेः राज्याच्या बऱ्याच भागात सध्या ढगाळ वातावरण (Cloudy Weather) आहे. त्यामुळे कापूस आणि सोयाबीन काढणी (Cotton Soybean Harvesting) आणि रब्बी पेरणीच्या (Rabi Sowing) कामात असलेल्या शेतकरी धास्तावले आहेत. पण सध्या ढगाळ वातावरण असले तरी पावसाची शक्यता (Rain Forecast) नाही, असं ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ माणिकराव खुळे (Manikraon Khule) यांनी सांगितलं.

Weather Update
Cotton Rate : कापूस वेचणी दरात किलोमागे तीन ते पाच रुपयांनी वाढ

राज्याच्या अनेक भागात सध्या कमाल तापमानात काहीशी वाढ झालेली आहे. तर मराठवाडा, विदर्भ, आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी ढगाळ वातावरण होतंय. सध्या राज्यातील बहुतांशी शेतकऱ्यांचं सोयाबीन खळ्यावर आहे.

Weather Update
Soybean Rate : सोयाबीनच्या दरात २०० रुपयांची सुधारणा

कापसाच्या वेचण्या बाकी आहेत. इतर धान्य काढणीची कामं सुरु आहेत. त्यामुळं पावसाच्या भीतीने शेतकऱ्यांची चिंता वाढली. आधीच ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसानं शेतकऱ्यांना पुरतं जेरीस आणलं. त्यामुळं पावसाच्या भीतीनं शेतकरीधास्तावले आहेत.

पण महाराष्ट्रात सध्या पाऊस पडण्यासाठी कोणत्याही प्रकारची प्रणाली नाही. त्यामुळं ढगाळ हवामान असलं तरी पावसाची शक्यता मुळीच नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी बिनधास्त असावं. आपली खरिपातील पिकांची काढणी पूर्ण करावी, असं आवाहन खुळे यांनी केलं.

तसंच आजपासून महाराष्ट्रात पुढील दोन दिवस सकाळच्या किमान तापमानात विशेष फरक जाणवणार नाही. तर शुक्रवारपासून पुढील ३ दिवस म्हणजे रविवारी नोव्हेंबर पर्यन्त मात्र किमान तापमानात ३ डिग्रीपर्यंत घसरण होऊन सध्यापेक्षा थंडी जाणवेल. विशेषतः खानदेशात ह्या थंडीचा प्रभाव अधिक जाणवेल. दुपारचे सध्याचे कमाल तापमानात सरासरी २ डिग्री वाढ- फरकामुळे महाराष्ट्रात दुपारचे तापमान ऊबदार जाणवेल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com