Weather Update : राज्यात पावसाची लगेच शक्यता नाहीः खुळे

राज्यात मागील ८ ते १० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी सोयाबीन, मका आणि कापूस काढणीच्या शिवाय हरभरा पेरणीच्या कमात व्यस्त आहेत.
राज्यात आज वादळी पावसाची शक्यता
राज्यात आज वादळी पावसाची शक्यताAgrowon

पुणेः राज्यात मागील ८ ते १० दिवसांपासून पावसाने उघडीप दिली. त्यामुळे शेतकरी सोयाबीन, (Soybean) मका (Maize) आणि कापूस (Cotton) काढणीच्या शिवाय हरभरा पेरणीच्या कमात व्यस्त आहेत. मात्र राज्यात एक नोव्हेंबरपासून पुन्हा पाऊस सुरु होईल, अशा बातम्या सोशल मिडियावर फिरत आहेत. पण या बातम्यांमध्ये तथ्य नसल्याचे हवामान विभागातील निवृत्त हवामानशास्त्रज्ञ माणिकराव खुळे यांनी सांगितले. 

राज्यात आज वादळी पावसाची शक्यता
Cotton Picking : कापूस वेचणीला झाली सुरुवात

राज्यात नोव्हेंबरच्या सुरुवातीपासून पहिल्या आठवड्यात जोरदार पाऊस पडेल, असं काही स्वयंघोषित हवामान तज्ज्ञ सांगत आहेत. त्यामुळे आधीच ऑक्टोबरमध्ये पावसाने मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांच्या मनात भीती निर्माण होत आहे. त्यामुळे माणिकराव खुळे यांनी हवामान आणि पावसाच्या अंदाजविषयी सविस्तर  विश्लेषण केले

राज्यात आज वादळी पावसाची शक्यता
Tur Rate : तूर दरातील तेजी कायम राहणार

सध्या राज्यात पावसाचा अंदाज नाही. भविष्यात चक्रीवादळमुळे एखादी प्रणाली तामिळूनाडू राज्याकडून वायव्येकडे सरकली तरच पाऊस येऊ शकतो. अन्यथा नाही. पाऊस पडणार असेल तर त्याचा अंदाज दिला जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामान विभागाच्या अंदाजावर विश्वास ठेवावा. शेतकऱ्यांनी पिकांची काढणी, मशागत पावसाची भीती न बाळगता करावी, असे आवाहन खुळे यांनी केले.

राज्यात आज वादळी पावसाची शक्यता
Soybean Rate : सोयाबीन बाजाराला पामतेलाचा आधार

सध्या तापमानातील फरक पाहता पहाटचे किमान तापमान हे सरासरी पेक्षा जवळपास ३ डिग्रीने कमी आहे. तर दुपारचे कमाल तापमानसुद्धा सरासरीपेक्षा २ डिग्रीने कमी आहे. त्यामुळे ऑक्टोबर हिटचा प्रभाव जाणवत नाही. किमान आणि कमाल तापमानातील वाढलेला फरक हा वातावरणात वाढलेल्या आर्द्रतेला मारक ठरत असला तरी घसरलेल्या किमान तापमानमुळे थंडीत वाढ आणि निरभ्र आकाशामुळे सकाळी पडणाऱ्या दवीकरणास मदत होत आहे, असेही खुळे यांनी स्पष्ट केले.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com