Union Budget 2023 : 'अर्थसंकल्पात आकर्षक शब्दांपलीकडे शेतीला काहीच नाही'

रसायनमुक्त नैसर्गिक शेती, किसान ड्रोन, शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा अशा आकर्षक शब्दांच्या पलीकडे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नाही.
Budget 2023 Agriculture
Budget 2023 AgricultureAgrowon

पुणे : "देशातील सर्वांत जास्त लोकांना रोजगार देणाऱ्या कृषी क्षेत्राला (Agricultural Area) आणि शेतकऱ्यांना अर्थसंकल्पातून (Budget 2023) काही दिलासा मिळाला नाही. ना पीककर्जाच्या व्याजदरात काही सवलत मिळाली, ना किमान आधारभूत किमतीबद्दल काही घोषणा केली:, अशी प्रतिक्रिया काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी (Nana Patole) दिली आहे.

पुढे ते म्हणाले की, खते बियाण्यांवरील जीएसटी कमी केला. ना शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा काही फॉर्म्यूला अर्थमंत्र्यांनी दिला.

अन्न, रसायनमुक्त नैसर्गिक शेती, किसान ड्रोन, शेतकऱ्यांना डिजिटल आणि हायटेक सेवा अशा आकर्षक शब्दांच्या पलीकडे या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांच्या पदरी काही पडले नाही.

Budget 2023 Agriculture
अकोला जिल्हा परिषदेचा अर्थसंकल्प ३२.४६ कोटींचा

नव्या आयकर योजनेनुसार ज्यांचे उत्पन्न १० लाख रुपये आहे, त्यांना ७८ हजार रुपये आयकर भरावा लागेल. जुन्या योजनेत तो ६५ हजार रुपये होता. इथे दिलासा मिळण्याऐवजी १३ हजार रुपयांचा आयकराचा बोजा मध्यमवर्गीयांवर पडणार आहे.

नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Agrowon
www.agrowon.com