इंदापूरमध्ये शेतकऱ्यांच्या पशुधनावर चोरट्यांचा डल्ला

तालुक्यातील शेतकरी अवकाळी पाऊस, बदलते हवामान, बाजारभावातील चढ-उतार यामुळे मेटाकुटीला आलेला असताना आता त्याच्या पशुधनावर चोरटे डल्ला मारू लागले आहेत.
Animal Care
Animal CareAgrowon

इंदापूर, जि. पुणे ः तालुक्यातील शेतकरी अवकाळी पाऊस (Untimely Rain), बदलते हवामान (Climate Change), बाजारभावातील चढ-उतार यामुळे मेटाकुटीला आलेला असताना आता त्याच्या पशुधनावर (Livestock Theft) चोरटे डल्ला मारू लागले आहेत. इंदापूर तालुक्यात तीन वेगवेगळ्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या शेळ्या, बोकड, म्हैस चोरून नेल्याच्या घटना घडल्या आहेत.

Animal Care
Animal Care : जनावरांतील सर्पदंशावरील प्राथमिक उपचार

यामध्ये बिजवडी (ता. इंदापूर) येथील शेतकरी दिलीप जानबा सातव (वय ५२ वर्षे) यांच्या गोठ्यामध्ये १४ शेळ्या, ९ बोकड असे बंदिस्त होते. २१ ऑगस्ट रोजी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी कपाउंडची जाळी तोडून ८ शेळ्या व ४ बोकड असा एकूण ४८ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.

Animal Care
Animal Care : दुधाळ जनावरांतील गर्भपात

काटी यादववस्ती (ता. इंदापूर) येथील उमेश माधव काळे (वय ३८) यांनी बावडा पोलिस दूरक्षेत्र येथे दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांच्या घरालगत असलेल्या गोठ्यातील १५ शेळ्यांपैकी २ शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या. याची किंमत १६ हजार रुपये आहे. तर काळे यांच्या शेजारी राहणारे शहजान रेहमान मुलाणी यांच्या घरालगत गोठ्यामध्ये बांधलेल्या दोन शेळ्या अज्ञात चोरट्याने चोरून नेल्या असून, याची किंमत १३ हजार रुपये आहे. असा एकूण २९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेल्याची फिर्याद देण्यात आली आहे.

शेटफळ हवेली (ता. इंदापूर) येथील प्रथमेश रमेश पवार (वय १९ वर्षे) यांच्या शेतामध्ये कामगारांसाठी बांधलेल्या घरासमोर बांधलेली म्हैस अज्ञात चोरट्याने चोरून नेली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली आहे. यामध्ये त्यांचे चाळीस हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे नमूद करण्यात आलेले आहे. या प्रकरणी चोरट्यांचा तपास करण्याची मागणी फिर्यादी शेतकऱ्यांनी इंदापूर पोलिसांकडे केली आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
www.agrowon.com