Rabi Sowing : रब्बीसाठी साडेतेरा हजार क्विंटल बियाणे वितरित

कृषी विभागाच्या माध्यमातून रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना विविध योजनेतून तेरा हजार ७५२ क्विंटल बियाणे अनुदानावर वाटप करण्यात आले आहेत.
Indigenous Seeds
Indigenous SeedsAgrowon

नांदेड : कृषी विभागाच्या (Agriculture Department) माध्यमातून रब्बी हंगामासाठी (Rabi Season) शेतकऱ्यांना विविध योजनेतून तेरा हजार ७५२ क्विंटल बियाणे अनुदानावर (Subsidized Seed) वाटप करण्यात आले आहेत. यात हरभरा, रब्बी ज्वारी, करडई या पिकांच्या बियाणांचा समावेश असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांनी दिली.

Indigenous Seeds
Onion Seed Production : कांदा बीजोत्पादनामध्ये लागवड तंत्र महत्त्वाचे

जिल्ह्यात दरवर्षी शेतकऱ्यांना खरीप तसेच रब्बी हंगामात पेरणीसाठी बियाणे अनुदानावर वाटप करण्यात येतात. यात यंदाही खरिपासह रब्बीमध्ये शेतकऱ्यांना महाडीबीडी पोर्टलसह गरजू शेतकऱ्यांना मागणीनुसार बियाणे वितरित करण्यात आले आहे.

Indigenous Seeds
Onion Seed Production : शास्त्रीय पद्धतीने करा कांदा बीजोत्पादन

राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत रब्बीत हरभऱ्याचे दोन हजार ७८० क्विंटल प्रमाणित बियाणे वितरित केले आहे. ४१३ क्विंटल प्रात्यक्षिक घटकांतर्गत बियाण्यांचे वाटप झाले आहे. रब्बी ज्वारीत १८ क्विंटल बियाणे प्रात्यक्षिकात वितरित झाले आहे. तर पौष्टिक तृणधान्य योजनेत ६१ क्विंटल ज्वारीचे बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर देण्यात आले आहे.

ग्रामबीजोत्पादनात हरभऱ्याचे प्रमाणित बियाणे वितरित करण्यात आले आहे. यात दहा वर्षाखालील फुले विक्रम वाणाचे ३५१५ क्विंटल बियाणे वितरित केले आहे. तर दहा वर्षांवरील जॅकी ९२१८ हे हरभरा बियाणे ६८९१ क्विंटल वितरित करण्यात आले आहे.

यासोबतच राष्ट्रीय खाद्यतेल अभियानात गळीतधान्य योजनेअंतर्गत करडईचे १०४ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना अनुदानावर वितरित करण्यात आले आहे. कृषी विभागाच्या अनुदानित बियाण्यांमुळे शेतकऱ्यांचा बियाण्यांवरील खर्चात बचत झाली आहे.

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामापूर्वी विविध योजनेतून हरभरा, ज्वारी व करडईचे बियाणे अनुदानावर उपलब्ध करून देण्यात आले. यात हरभरा बियाणाचे वितरण मागेल त्या शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.
रविशंकर चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com