Sugarcane : शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत यंदा ऊसप्रश्न येणार चव्हाट्यावर

मागील वर्षाच्या गाळप हंगामात ऊसतोडणी करताना शेतकऱ्यांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सोसावा लागला. सुरुवातीच्या काळात कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणल्याने हा प्रश्न तयार झाला होता, असा शेतकऱ्यांनी आरोप केला होता.
Sugarcane
SugarcaneAgrowon

नगर ः मागील वर्षाच्या गाळप हंगामात (Sugarcane Season 2022) ऊसतोडणी (Sugarcane Harvesting) करताना शेतकऱ्यांना मोठा मानसिक आणि आर्थिक त्रास सोसावा लागला. सुरुवातीच्या काळात कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणल्याने हा प्रश्न तयार झाला होता, असा शेतकऱ्यांनी आरोप केला होता.

Sugarcane
Sugarcane Crop : भाकसखेडा येथे ड्रोनद्वारे ऊस पीक फवारणी प्रात्यक्षिक

त्यामुळे आता साखर कारखान्यांच्या कार्यक्षेत्रात येणाऱ्या शेवगाव तालुक्यातील संपूर्ण उसाचे गाळप केल्याशिवाय बाहेरून ऊस आणू देणार नसल्याची भूमिका घेत शुक्रवारी (ता.७) शेवगाव तालुक्यातील भातकुडगाव येथे माजी जिल्हा परिषद सदस्य हर्षदा काकडे व ॲड. शिवाजीराव काकडे यांनी ऊस उत्पादकांचा मेळावा घेतला. त्यामुळे शेवगाव तालुक्यात उसाचा प्रश्न चव्हाट्यावर येणार आहे.

नगर जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या गाळप हंगामात अतिरिक्त उसामुळे शेतकऱ्यांना आपला ऊस साखर कारखान्याला तोडणी करून देताना कसरत करावी लागली. साखर कारखान्यांनी सुरुवातीच्या काळात कमी दरात कार्यक्षेत्राबाहेरील ऊस आणला. त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना ऊस घालण्यासाठी एकरी पाच ते दहा हजार रुपये खर्च करावे लागले. शिवाय उसाची तोडणी कालावधीपेक्षा दोन ते चार महिने उशिराने झाली.

Sugarcane
Sugarcane Crushing : गेल्या गळीत हंगामात विक्रमाच्या राशी

त्यामुळे वजनात घट झाली. गतवर्षी ऊस ऊसत्पादकांचे हाल होत असताना साखर कारखान्यांनी कसलीही मदत केली नसल्याचा आरोप केले गेला. शुक्रवारी (ता.७) पहिल्यांदा नगर जिल्ह्यात माजी जिल्हा परिषदेच्या सभापती हर्षदा काकडे व जनशक्ती विकास आघाडीचे नेते ॲड. शिवाजीराव काकडे यांनी ऊसप्रश्नावर भातकुडगाव (ता.शेवगाव) येथे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळावा घेऊन यंदाच्या गाळप हंगामात उसाचा प्रश्न निर्माण झाला तर आंदोलन करण्याचा इशाराच दिला.

Sugarcane
Sugarcane seeds : पाडेगाव ऊस केंद्रात मिळणार दर्जेदार ऊस बेणे

जगन्नाथ गावडे, माजी जिल्हा परिषद सदस्य रामभाऊ साळवे, उदय बुधवंत, कॉ. राम पोटफोडे, नामदेव सुसे, राम शिदोरे, भाऊसाहेब सातपुते, प्रशांत भराट, बाळासाहेब फटांगरे, आबासाहेब राऊत, राजू पातकळ, भाऊसाहेब राजळे, लक्ष्मण पातकळ, गणेश आहेर, श्‍याम खरात, भाऊसाहेब पोटभरे, रमेश दिवटे, राजेंद्र उगलमुगले आदी प्रमुख लोक मेळाव्याला उपस्थित होते. शेवगाव, पाथर्डी तालुक्यात लोकनेते मारुतराव घुले भेंडा, संघर्षयोद्धा बबनराव ढाकणे केदारेश्वर, वृद्धेश्वर व गंगामाई (खासगी) असे साखर कारखाने आहेत. चार कारखाने असूनही उसाचा प्रश्न तयार होत असल्याने यावेळी ऊस प्रश्न चव्हाट्यावर येणार असे दिसते आहे.

‘शेतकरीच उद्रेक करतील’

शेवगाव, पाथर्डी तालुक्यांत चार कारखाने असून गेल्यावर्षी कारखान्याचे कार्यक्षेत्र असूनही तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ऊसतोडणीसाठी मनस्ताप सहन करावा लागतो. कारखान्यांचे गाळपाचे चुकीचे नियोजन, कार्यक्षेत्राबाहेरून कमी दरात ऊस आणणे, नोंदी प्रमाणे तोडणी कार्यक्रम न राबवणे, ऊसतोडणी कामगार, मजूर मुकादम व कारखाना कर्मचारी यांच्याकडून तोडणीसाठी पैशाची मागणी करणे या प्रकारांमुळे शेतकरी त्रस्त झाल्याचा आरोप करत यंदा शेतकऱ्यांना वेठीस धरले तर उद्रेक होईल असा इशारा या मेळाव्यात दिला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com